पुणे - महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोेधात बंड केल्यानंतर महाविकासआघाडीचे सरकार टिकण्यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राज्यातील राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस तापत आहे. यावर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले ( chandrakant patil on maharashtra government ) आहे. राज्यातली राजकीय परिस्थितीती पाहता भाजपने आपले रूटीन काम हे नियमितपणे सुरू ठेवावे ( BJP will continue routine work ) हीच भाजपची भूमिका आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एका कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Shiv Sena leader Eknath Shinde ) यांनी शिवसेनेचे आणि अपक्ष असे 40 हून अधिक आमदार आपल्यासोबत घेऊन बंड केल्याने सरकार अस्थिर झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यात भाजप स्थिर सरकार देणार का असे चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, त्यावरही त्यांनी प्रतिक्रीया दिली. राज्यात अशी कुठलीही गोष्ट घडलेली नाही ( Nothing has happened in the maharashtra ) की त्यात भाजप नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे ते म्हणाले की . जे चालले आहे त्यावर राजकीय पक्ष म्हणून निरीक्षण सुरू ( BJP observe Situation ) आहे. तसेच भाजप राज्यात महविकास आघाडी सरकार अस्थिर आहे स्थिर आहे यापेक्षा आपले रूटीन कार्यक्रम करत आहे. असही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सध्या दिल्ली दौरे जास्त होऊ लागले आहेत. त्यावर पाटील यांना विचारलं असता ते त्यांचे रूटीन काम आहे. तुम्हाला आत्ता कळत आहे. त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा ते जातात. असं देखील यावेळी पाटील म्हणाले. या बंडामागे भाजप आहे? आसाम मधील भाजपचे अनेक नेते बंड आमदारांना भेटत आहेत? यावर पाटील यांना विचारले असता ते मला माहित नाही. मला बऱ्याचश्या गोष्ठी या तुमच्याकडून कळत आहेत. राज्यात याची चर्चा सुरू आहे त्याविषयी मला काहीच माहिती नाही असं देखील यावेळी पाटील म्हणाले.
हेही वाचा - Sharad Pawar leave for Delhi : शरद पवार आज मुंबईहून दिल्लीला रवाना होणार