ETV Bharat / city

पतीने मित्रांना करायला लावला स्वतःच्या पत्नीवर बलात्कार; मुंबईतील उद्योजक पतीला अटक - mumbai crime

स्वत:च्या पत्नीवर आपल्या 3 मित्रांकडून बलात्कार करवणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीच्या पत्नीने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पतीने त्याच्या मित्रांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थपित करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे

wife swapping incident from mumbai
पतीने मित्रांना करायला लावला स्वतःच्या पत्नीवर बलात्कार
author img

By

Published : Dec 19, 2019, 3:00 PM IST

मुंबई - स्वत:च्या पत्नीवर आपल्या 3 मित्रांकडून बलात्कार करवणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेला 46 वर्षीय आरोपी प्रतिष्ठित उद्योजक आहे.
आरोपीच्या पत्नीने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पतीने त्याच्या मित्रांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थपित करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. 2017 पासून हा प्रकार सतत घडत होता.

पतीने त्याच्या तीन मित्रांकडून आपल्यावर सतत बलात्कार करवला होता. तसेच यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

समतानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उद्योजक व पीडित महिलेला दोन लहान मुले आहेत. घटस्फोट मिळण्यासाठी पीडितेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच मुलांचा ताबा मिळावा यासाठी संबंधित महिला प्रयत्नशील आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर समतानगर पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने संबंधित आरोपीला 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.
पीडित महिलेच्या आरोपानुसार, तिच्या पतीने 3 मित्रांसोबत मिळून 'वाईफ स्वॅपिंग' अनेक वेळा केले होते. या बद्दल कोणाकडेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे पीडितेने सांगितले. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:समतानगर पोलिसांनी पत्नीवरच आपल्या 3 मित्रांकडून बलात्कार करवण्याच्या आरोपाखाली एका 46 वर्षीय उद्योजकाला अटक केली आहे. या उद्योजकाच्या पत्नीच्या आरोपानुसार जून 2017 पासून तिच्या पतीने त्याच्या मित्रांकडून तिच्यावर वारंवार बलात्कार करवला आहे . 2017 पासून सतत ही गोष्ट पीडित महिलेसोबत घडत होती. Body:आरोपी उद्योजक व पीडित महिलेला दोन लहान मुलं असून या मुलांचा ताबा मिळत नवऱ्यापासून घटस्फोट मिळावा म्हणून पीडित महिलेने न्यायालया मध्ये याबद्दल याचिका दाखल केली होती. या दरम्यान पतीने 2017 पासून त्याच्या तीन मित्रांकडून आपल्यावर सतत बलात्कार करवला होता ज्याचे काही व्हिडीओ रेकॉर्डिंग सुद्धा केले असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या संदर्भात न्यायालयाच्या आदेशानंतर समतानगर पोलिस ठाण्यामध्ये याबद्दल तक्रार दाखल करण्यात येऊन या 46 वर्षीय उद्योजकाला अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयाने या उद्योजकाची रवानगी 23 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत केलेली आहे.

पीडित महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीने त्याच्या 3 मित्रांसोबत मिळून वाईफ स्वॅपिंग ( पत्नीची दुसऱ्या पुरुषांसोबत अदला बदली ) गेल्या 3 वर्षात बऱ्याच वेळा केली होती. या बद्दल कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारू अशी धमकी सुद्धा या महिलेच्या पतीने तिला दिली होती. यआ संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.