ETV Bharat / city

Remember Balasaheb Thackeray : का होतेय विरोधकांना बाळासाहेबांची आठवण?

author img

By

Published : May 23, 2022, 7:50 PM IST

भारतीय जनता पक्षाचे असलेली युती तोडत शिवसेनेने राज्यांमध्ये महाविकासआघाडीची सत्ता ( Power of Maha Vikas Aghadi ) स्थापन केली. महा विकासआघाडी सरकारला जवळपास अडीच वर्षे उलटून गेली आहेत. या अडीच वर्षात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी अडीच वर्षात एकमेकांच्या विरोधात नेहमीच भूमिका घेतलेली पाहायला मिळाली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांची प्रत्येक घटनेवर आठवण काढली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडून प्रत्येक वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कशी होती, याबाबत जाणून बुजून आठवण करून दिली जात आहे.

Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeray

मुंबई: ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सातत्याने विरोधकांकडून बाळासाहेबांचा दाखला दिला जातोय. बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर शिवसेना अशी वागली नसती, असा टोमणा सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि इतर विरोधकांकडून देण्याचा प्रयत्न दिसतोय. मात्र बाळासाहेब आणि शिवसैनिकांचे असलेले नाते लक्षात घेता भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचे असलेली युती तोडत राज्यांमध्ये महाविकासआघाडीची सत्ता ( Power of MVA in the states ) स्थापन केली. महा विकासआघाडी सरकारला जवळपास अडीच वर्षे उलटून गेली आहेत. या अडीच वर्षात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी अडीच वर्षात एकमेकांच्या विरोधात नेहमीच भूमिका घेतलेली पाहायला मिळाली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून बाळासाहेब ठाकरे यांची प्रत्येक घटनेवर आठवण काढली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडून प्रत्येक वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कशी होती, याबाबत जाणून बुजून आठवण करून दिली जात आहे. या सोबतच राणा दाम्पत्य किंवा राज ठाकरे यांच्याकडून ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून टोमणा मारण्यात येत आहे.

बाळासाहेब ठाकरे असताना कसे होते युतीचे नाते?

बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) आणि भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन ( BJP leader Pramod Mahajan ) आणि गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचा जन्म झाला होता. पहिल्यांदा 1989 साली या दोन्ही पक्षांमध्ये युती झाली. त्यावेळेस ही युती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित होती. त्यानंतर 1990 ला झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्रितरित्या निवडणूक लढली होती. या निवडणुकांमध्ये ज्योतीला यश आलं नसलं तरी त्यांच्या जागांमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये या युतीला चांगले यश मिळाले. शिवसेनेने 73 तर भारतीय जनता पक्षाने 65 जागांवर यश संपादन करत राज्यात पहिल्यांदाच युतीचं सरकार स्थापन झालं. मात्र त्यानंतर झालेल्या 1999 च्या निवडणुकांमध्ये युतीचं सरकार खाली आल. परंतु राज्यात युती कायम राहिली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या दोन्ही पक्ष एकमेकांची साथ देत राहीले.

सत्ता असताना किंवा सत्ता नसताना नेहमी दोन्ही पक्षांमध्ये खटके उडत असल्याचे देखील पाहायला मिळाले. त्यावेळी राज्यात शिवसेना मोठा भाऊ तर भारतीय जनता पक्ष छोटा भाऊ असेल असा अलिखित नियम युतीत होता. मात्र युती स्थापन करणारे बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena leader Balasaheb Thackeray ), प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे हयात नसल्याने त्यानंतर युतीचे नियमही बदलत गेले. 2014 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष युतीत लढले, तरी विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष वेगळे झाले. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून भाजपने युती तोडण्याचा जाहीर केलं आणि तिथेच पंचवीस वर्षे असलेल्या युतीत मिठाचा खडा पडला. निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्रित आल्यानंतर ही दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात असलेले पाहायला मिळाले. दोन्ही पक्षाच्या विचारांमध्ये असलेले साम्य 2014 च्या निवडणुकीनंतर वेगळे होत गेले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून असणारे देवेंद्र फडणवीस यांच्यात एक वाक्यता राहिली नाही. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढले, तरी मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला एकत्रित आणत, राज्यामध्ये महा विकास आघाडी सरकार स्थापन केले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात कटुता प्रचंड वाढली.

भाजपकडून सातत्याने काढली जाते बाळासाहेबांची आठवण -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
महा विकास आघाडी सरकार स्थापन करत शिवसेनेने राज्याची सत्ता आपल्या हातात घेतली असली, तरी शिवसेना आता हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही. हिंदुत्व आणि शिवसेनेचा संबंध राहिला नसल्याची टीका सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून केली जात आहे. हिंदुत्वासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला त्याग आणि देशाला दिलेली दिशा पासून शिवसेना पूर्णपणे वेगळी झाली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालत नाही, असा सातत्याने टोमणा राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांच्याकडून लगावला जातो. तसेच भारतीय जनता पक्षाचे इतर नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करतात.

बाळासाहेब ठाकरेंवरुन राज ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा -

राज ठाकरे
राज ठाकरे
पुण्यामधील सभेत खुद्द राज ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून शिवसेनेला टोला ( Raj Thackeray cirtcism Shiv Sena from Balasaheb ) लगावला. महा विकास आघाडी सरकार बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं असतं, तर ते देखील सुखावले असते. असं वक्तव्य शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते. मात्र आपल्या सोयीसाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावातील विश्वास घालवत आहे, असे राज ठाकरे यांनी थेट सभेतून सांगितले.

राणा दाम्पत्यांनाही बाळासाहेबांची आठवण -

राणा दाम्पत्य
राणा दाम्पत्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खाजगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा वाचण्याचा हट्ट राणा दाम्पत्याने ( Rana couple on Shiv Sena ) केला. यावरून राजकीय वादंग उठलं. त्यातच राजद्रोहाच्या कलमाखाली या दाम्पत्यांला तुरुंगातही जावे लागले. मात्र बाळासाहेब ठाकरे हे हिंदूंचे पुरस्कर्ते होते. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही, असा टोला राणा दाम्पत्याने शिवसेनेला लगावला होता.

भावनिकतेला हात घालण्याचा विरोधकांचा प्रयत्न -

सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन शिवसेनेच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न विरोधक करत आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचे अतूट नात आहे. याचाच फायदा घेत विरोधक सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत आहे. मात्र आजही शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्याच विचाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे घेऊन चालले आहेत. मात्र भारतीय जनता पक्ष, मनसे आणि राणा दांपत्य हे केवळ राजकीय स्वार्थापोटी बाळासाहेबांचं नाव घेत असल्याची टीका, शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच कोणत्याही मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेतली. भूमिकांच्या परिणामांचा विचार न करता त्यांनी त्यांची भूमिके घेतली आहे. बाबरी मज्जिद प्रकरणातही बाळासाहेबांनी कणखर भूमिका फक्त समाज माध्यम नाहीतर, कोर्टापुढेही ठेवली. त्यामुळे त्यांचा एक वेगळा ठसा जनसामान्यात होता. यासोबतच राजकीय भूमिका घेताना ही फायदा तोट्याचा विचार कधीही बाळासाहेब ठाकरे यांनी केला नाही. मात्र आताच्या परिस्थिती शिवसेना उद्धव ठाकरे हे चालवत आहेत. अनेक वेळा त्यांची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखी ठोस दिसत नाही. मात्र बाळासाहेब हयात नसतानाही शिवसेनेला सत्तेच्या उंचीपर्यंत नेण्याचं काम उद्धव ठाकरे यांचं योगदान नाकारता येणार नाही.

हे सर्व करत असताना, भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आता ही शिवसेना पुढे घेऊन जात असल्याचा उल्लेख सातत्याने त्यांच्याकडून केला जातो. पंरतु उद्धव ठाकरे यांना भावनिकदृष्ट्या अडकवण्यासाठी सातत्याने विरोधकांकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला जात असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रविण पुरो ( Political analyst Pravin Puro ) हे व्यक्त करतात.

हेही वाचा - Aarey Forest : आरेतील पक्षांची तहान भागवण्यासाठी धडपडणारा अवलिया !

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.