ETV Bharat / city

सावरकरांना अद्याप भारतरत्न का दिला नाही? शिवसेनेचा भाजपला सवाल - संजय राऊत बातमी

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजपनेही उत्तर दिले होते.

Sanjay Raut
संजय राऊत - खासदार, शिवसेना
author img

By

Published : Oct 26, 2020, 6:16 PM IST

Updated : Oct 26, 2020, 6:57 PM IST

मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजपनेही उत्तर दिले होते. सावरकरांसंदर्भात अपमानकारक बोलत असताना शिवसेना गप्प का होती? असा सवाल भाजपने केला होता. त्यावर संजय राऊत यांनीही भाजपने अद्याप सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? असा सवाल करत पलटवार केला आहे.

हेही वाचा - 'उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व काँग्रेस अन् राष्ट्रवादीमुळे भेसळयुक्त झालंय'

सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी शिवसेनेने पहिल्यांदा केली - संजय राऊत

दरम्यान, सावरकर नेहमीच शिवसेनेचे मार्गदर्शक म्हणून राहिले आहेत. सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला शिवसेनेने त्यांच्याबाजूने भूमिका घेतली. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणीही सेनेने पहिल्यांदा केली होती. त्यामुळे जे आता आम्हाला प्रश्न विचारत आहेत, त्यांनी सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? असे प्रश्न संजय राऊत यांनी भाजपला विचारला.

उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व काँग्रेस अन् राष्ट्रवादीमुळे भेसळयुक्त झाले - भाजप

काल शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा झाला. त्यात शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. यावर भाजपने प्रतिक्रिया दिली. ठाकरेंचे हिंदुत्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे आता भेसळयुक्त झाले आहे. आम्ही हिंदू संस्कृती जपणारे आहोत. त्यामुळे आम्ही काल सणासुदीच्या दिवशी याविषयी प्रतिक्रिया दिली नाही, असे भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितले.

असा आहे सावरकर आणि वाद
१९४८ मध्ये महात्मा गांधींच्या हत्येच्या सहाव्या दिवशी सावरकरांना गांधी हत्येचा कट रचल्याप्रकरणी मुंबईतून अटक केली होती. नंतर फेब्रवारी १९४९ मध्ये त्यांची मुक्तता करण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनसंघाचे कधीही सदस्य न राहिलेल्या सावरकरांचे नाव संघ परिवारात मोठ्या आदराने घेतले जाते. वर्ष २००० मध्ये वाजपेयी सरकारने तत्कालीन राष्ट्पती के.आर. नारायणन यांच्याकडे सावरकरांना 'भारत रत्न' देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. परंतु तो मंजूर करण्यात आला नाही.

त्यानंतर २६ मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दोन दिवासात वीर सावरकरांची १३१ वी जयंती होती. त्यावेळी मोदी संसद भवनातील सावरकरांच्या तैलचित्रासमोर नतमस्तक झाले होते. सर्वांना कबूल करावे लागेल, की सावरकर वादग्रस्त व्यक्तिमत्व होते.

गांधी हत्याकांड प्रकरणी सावरकारांविरुद्ध खटला चालला होता. जरी ते यातून निर्दोष सुटले होते, तरी त्यांच्या जीवनकाळातच त्यांच्या चौकशीसाठी कपूर आयोग बसवला होता. या आयोगाच्या अहवालात संशयाची सुई सावरकरांकडे होती. अशा नेत्याला सार्वजनिकरित्या इतका मोठा सन्मान देणे मोदींकडून मोठे प्रतीकात्मक पाऊल होते.

नाशिक कलेक्टरच्या हत्येप्रकरणी झाली होती अटक

आपल्या जहाल राजकीय विचारांमुळे सावरकरांना पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून निलंबित करण्यात आले होते. १९१० मध्ये सावरकरांना नाशिक कलेक्टरच्या हत्येप्रकरणी लंडनमधून अटक करण्यात आली होती. कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्येप्रकरणी सावरकरांचे मोठे भाऊ बाबाराव सावरकर यांना अटक करण्यात आली होती.

विनायक सावरकरांवर आरोप होता, की त्यांनी भावासाठी लंडनहून एक पिस्तूल पाठवली होती. त्यानेच जिल्हाधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली होती. समुद्रातील त्या प्रसिद्ध उडीनंतर पुढील जवळपास २५ वर्षांपर्यंत सावरकर कोणत्या ना कोणत्या रुपात इंग्रजांचे कैदी राहिले. त्यांनी सावरकरांना २५-२५ वर्षांचा दोन वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या व काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी सावरकरांनी अंदमानावर पाठवण्यात आले.

परंतु सेल्युलर जेलमध्ये भोगलेल्या ९ वर्षे १० महिन्यांच्या तुरुंगवासानंतर इंग्रजांचे सावरकरांविषयी मन बदलले. असे म्हटले जाते की, ११ जुलै १९११ रोजी सावरकर अंदमानला पोहोचले व २९ ऑगस्तला त्यांनी आपला पहिला माफीनामा लिहिला. तेथील ९ वर्षाच्या कारावासात जवळपास ६ वेळा इंग्रजांकडे माफीनामा पाठवला.

अंदमानमध्ये दर महिन्याला ३-४ कैद्यांना फाशी दिली जात होती. याचा परिणाम सावरकरांवर झाला. त्यावेळी सावरकरांसोबत शिक्षा भोगत असलेले अन्य एक कैदी बरिंद्र घोष यांनी लिहिले आहे, की सावरकर बंधु आम्हाला जेलर विरुद्ध आंदोलन करण्यास प्रवृत्त करत परंतु ते सक्रीय सहभाग घेत नसत.

त्यानंतर सावरकर व त्यांच्या समर्थकांनी इंग्रजांची माफी मागण्याला एक रणनिती संबोधले. त्यामुळे तुरुंगात त्यांना काही सवलती मिळाल्या. सावरकरांनी आपल्या आत्मकथेत म्हटले आहे, की जर मी तुरुंगात आंदोलन केले असते तर भारतात पत्र पाठविण्याचा अधिकार मिळाला नसता. त्याचबरोबर त्यांची रणनिती होती, की भूमिगत राहूनही क्रांतीकारी चळवळ चालवली जाऊ शकते.

जाणून घ्या, सावरकरांचे कडवे हिंदुत्व
अंदमानहून परत आल्यानंतर सावरकरांनी 'हिंदुत्व - हू इज़ हिंदू?' हे पुस्तक लिहून एका राजकीय विचारधारेचा वापर केला. हिंदुत्वाची व्याख्या सांगताना ते म्हणत की, देशातील प्रत्येक व्यक्ती पहिल्यांदा हिंदू आहे. देशाचा नागरिक तोच होऊ शकतो ज्याची पितृ भूमि, मातृ भूमि व पुण्यभूमी भारत असेल. पितृ आणि मातृ भूमि कोणाचीही असू शकते परंतु पुण्य भूमि केवळ हिंदू, शीख, बौद्ध व जैनांची होऊ शकते. त्यामुळे मुसलमान व खिश्चन या देशाचे नागरिक होऊ शकत नाहीत. १९२४ मध्ये सावरकरांनी येरवडा जेलमधून दोन अटींवर सोडण्यात आले. एक ते कोणत्याही राजकीय प्रक्रियेत सहभाग घेणार नाहीत व जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुमतीशिवाय रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाहीत.

इतिहास संशोधक सांगतात की, सावरकरांनी लॉर्ड व्हाईसरॉय लिनलिथगो यांच्याशी करार केला होता, की त्यांचा समान उद्देश्य आहे, गांधी, काँग्रेस व मुसलमानांचा विरोध. सावरकरांनी इंग्रजांकडून प्रतिमाह पेन्शनही मिळत होती.

३० जानेवारी १९४८ रोजी नथूराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर आठ लोकांबरोबरच सावरकरांनाही अटक केली होती. त्यानंतर संघाला गांधी हत्येचा डाग पुसण्यास खूप वर्षांचा काळ व्यतीत करावा लागला.

धनंजय कीर यांनी त्यांच्या 'सावरकर एंड हिज़ टाइम्स' पुस्तकात म्हणतात, की लाल किल्ल्यात चाललेल्या खटल्यात न्यायधीशांनी सावरकरांना मुक्त केले व नथूराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी सुनावली. त्यावेळी अनेक जण सावरकरांच्या पाया पडले व त्यांनी नारेबाजी केली.

Last Updated : Oct 26, 2020, 6:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.