ETV Bharat / city

Congress President Election : कोण होणार काँग्रेस अध्यक्ष? आज होणार मतदान - Mallikarjun Kharge vs Shashi Tharoor

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक ( Election of Congress President ) सोमवारी होणार आहे. तब्बल २२ वर्षांनी अध्यक्षपदासाठी निवडणुक पार पडत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते मलिकार्जून खर्गे विरुद्ध शशी थरूर ( Mallikarjun Kharge Vs Shashi Tharoor ) अशी लढत होणार आहे.

Congress president Election
कोण होणार काँग्रेस अध्यक्ष?
author img

By

Published : Oct 16, 2022, 8:41 PM IST

Updated : Oct 17, 2022, 7:51 AM IST

मुंबई - तब्बल २२ वर्षांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ( All India Congress Committee ) अध्यक्षपदाची निवडणूक ( Election of Congress President ) सोमवारी होणार आहे. या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय ( Maharashtra Pradesh Congress Committee ) टिळक भवन येथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मतदान पार पडणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मलिकार्जून खर्गे विरुद्ध शशी थरूर ( Mallikarjun Kharge Vs Shashi Tharoor ) अशी लढत होणार आहे.

५६१ प्रदेश प्रतिनिधी बजावणार मतदानाचा हक्क ? अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी सोमवारी मतदार होणार आहे. यासाठीची सर्व तयारी झाली आहे. देशभरातील सर्व राज्यांमध्ये हे मतदान होणार असून महाराष्ट्रातही मतदानाची पूर्ण तयारी झालेली आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे मतदानाचे केंद्र असून तीन बूथवर सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत राज्यातील ५६१ प्रदेश प्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात.

मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे या निवडणुकीसाठीचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, आ. कृष्णा पुनिया हे मतपेट्या घेऊन मुंबईत आले आहेत. आज त्यांनी टिळक भवन येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. जे प्रदेश प्रदेश प्रतिनिधी मतदार आहेत, त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बारकोड असलेले ओळखपत्र दिलेले आहे. ते ओळखपत्र आणि दुसरे कुठलाही फोटो पुरावा ओळखपत्र जसे की मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक यापैकी एक अशी दोन्ही ओळखपत्रे दाखवल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी केले आहे.

Last Updated : Oct 17, 2022, 7:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.