ETV Bharat / city

प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची वर्णी? थोरात जाणार की राहणार

author img

By

Published : Jan 6, 2021, 11:58 AM IST

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष बदलाची चर्चा सध्या जोरदार रंगु लागली आहे. थोरात यांनी यापूर्वीच पक्षश्रेंष्ठींना जर नवा चेहरा आणायचा असल्याच आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचेही स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य प्रभारी एच.के पाटील मुंबईत आहेत. मात्र, राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता प्रदेशाध्यक्ष पदाजी धुरा कोणाच्या गळ्यात पडणार की थोरांतच काँग्रेसचा गाडा हाकणार हे चित्र लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची वर्णी
प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची वर्णी

मुंबई - राज्यात सध्या प्रदेश काँग्रेस अध्यक्षांच्या बदलाची चर्चा जोरदार सुरू आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बदलल्यानंतर या प्रक्रियेला अधिक वेग आला आहे. थोरात यांनी यापूर्वीच पक्षश्रेंष्ठींना जर नवा चेहरा आणायचा असल्याच आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचेही स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य प्रभारी एच. के पाटील मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी पृथ्वीराज चव्हाणांसह बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. बुधवारी ते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहेत. त्यात ते प्रदेशाध्यक्षा बाबत चर्चा करतील.

या नावांची आहे चर्चा

राज्यात सध्या मराठा आरक्षण, औरंगाबादचे नामांतर या सारख्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेसकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. यावरून मराठा समाजाचा काँग्रेसविरोधात रोष आहे, अशा परिस्थितीत जर थोरातांनी राजीनामा दिला तर प्रदेश काँग्रेसची धुरा मराठा नेत्याकडे जाणार की मराठेत्तर हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्य स्थितीत थोरात यांच्या जागी तरुण नेतृत्वाला प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली जावी, अशी एक चर्चा आहे. त्यात सर्वात आघाडीवर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुक यांचे पुत्र अमित देशमुख यांचे नाव चर्चेत आहेत. त्यांच्या बरोबर महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, सुनिल केदार, नाना पटोल यांचेही नाव चर्चेत आहेत. त्याच बरोबर खासदार राजीव सातव यांचेही नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी समोर आले आहे.

अमित देशमुख

अमित देशमुख हे सध्या राज्यमंत्री मंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून काम पहात आहेत. ते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आहेत. लातूर शहर मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करतात. मराठा तरुण चेहरा आणि मराठवाड्याचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे अशा तरुण नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

यशोमती ठाकूर- सुनिल केदार

यशोमती ठाकूर एक आक्रमक महिला मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. त्या सध्या महिला व बालविकास मंत्रालयाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्या विदर्भातील तिवसा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. विदर्भ हा काँग्रेसचा एकेकाळी गड होता. ठाकूर यांना प्रदेशाध्यक्ष केल्यास काँग्रेसला विदर्भात गतवैभव प्राप्त होईल अशी आशा आहे. त्यामुळे त्यांचे नावही चर्चेत आहे. त्याच बरोबर क्रीडा मंत्री सुनिल केदार यांचेही नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीसांचे ते कट्टर विरोधक तर गांधी घराण्याचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ओबीसी समाजाचा चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.

नाना पटोले

नाना पटोले यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळत आहे. ते विद्यमान विधानसभेचे अध्यक्ष आहेत. शेतकरी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. ओबीसी समाजाचे ते प्रतिनिधीत्व करतात. शिवाय विदर्भातील असल्याने त्याचा थेट फायदा काँग्रेसला होवू शकतो, त्यामुळे काँग्रेसमधील एक गट पटोले यांच्या नावासाठी आग्रही आहे. त्यांचा आक्रमक स्वभावही काँग्रेसच्या पथ्यावर पडणारा आहे.

राजीव सातव-

खासदार राजीव सातव यांचेही नाव अचानक समोर आले आहे. ते सध्या गुजरातचे प्रभारी म्हणून कार्यरत आहे. पण तरूण नेता संघटन कौशल्य यामुळे त्यांनाही प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या नावासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आग्रही असल्याचे सुत्रांकडून समजते. शिवाय सातव यांचे पक्षश्रेष्ठीं बरोबरही अतीशय जवळचे संबध आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला अधिक पसंती मिळू शकते.

बिगर मराठा चेहरा देण्याची मागणी-

प्रदेशाध्यक्ष कोण असावा याबाबत काँग्रेसमध्ये सध्या खलबतं सुरू आहेत. त्यात जेष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केली जात आहे. तरुण आणि नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, असा सर्व सामान्य मत प्रवाह सध्या आहे. तर काहींनी जैसे थे स्थिती ठेवावी, असेही मत व्यक्त केले आहे. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरत आहे. त्या पार्श्वभूमीवर गैर मराठा चेहरा प्रदेशाध्यक्ष असावा, असेही काहींनी सुचित केले आहे. तसे झाल्यास नाना पटोल, सुनिल केदार आणि विजय वडेट्टीवार या पैकी एकाची वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.