ETV Bharat / city

Ketaki Chitale Controversy : कोण आहे केतकी चितळे?, का आली अडचणीत - केतकी चितळे वादग्रस्त फेसबुक पोस्ट

केतकी चितेळेने शरद पवार यांच्या वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये शरद पवारांच्या व्यंगावर टीप्पणी करण्यात आली आहे. केतकीवर सर्वच स्तरातून टीका होत ( Ketaki Chitale Controversy ) आहे.

Ketaki Chitale
Ketaki Chitale
author img

By

Published : May 14, 2022, 4:36 PM IST

Updated : May 14, 2022, 5:03 PM IST

मुंबई - उपराकार लक्ष्मण माने यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात कष्टकऱ्यांच्या व्यथा सांगताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची कविता वाचून दाखवली. या कवितेनंतर पवारांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढले, अशी टीका भाजपने केली होती. त्यातच आता अभिनेत्री केतळी चितळेने शरद पवारांवर अभद्र भाषेत टीका केली आहे.

केतकी चितेळेने शरद पवार यांच्या वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये शरद पवारांच्या व्यंगावर टीप्पणी करण्यात आली आहे. केतकीवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वांनीच केतकीवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर तर केतकीला ट्रोल केलं जात आहे. त्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ झाली ( Ketaki Chitale Controversy ) आहे.

कोण आहे केतकी चितळे ( Who Is Ketaki Chitale ) - छोट्या पडद्यावरील 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेत केतकीने भूमिका साकारली होती. त्यामुळे महाराष्ट्रतील घराघरा ती पोहचली होती. मात्र, त्यानंतर ती कोणत्याही भूमिकेत अथवा मालिकेत दिसली नाही. पण, केतकी तिच्या भूमिकांमुळे कमी तर वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत राहिली आहे. त्याचसोबत, एपिलेप्सी या आजाराने ती ग्रासली असल्याचे तीने सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगितले होते. तेव्हा ती चर्चेत आली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख - छत्रपती शिवाजी महाराज आणि अरबी समुद्रातील स्मारकाबाबत कॉमेडियन अग्रिमा जोशुआने वक्तव्य केले होते. या प्रकणावरुन तिच्यावर टीका करण्यात आली होती. तेव्हा तिने माफी मागितली. परंतु, केतकीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता. शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण विसरुन त्यांच्या नावावर राजकारण करण्याचा पोकळ विनोद सुरु आहे, असे तिने लिहले होते. त्यामुळे शिवप्रेमींनी केतकीला ट्रोल केले होते.

Ketaki Chitale
केतकी चितळे फेसबुक पोस्ट

अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल - सोशल मीडियावर एक पोस्ट करताना केतकीने धर्म-पंथाचा उल्लेख केला होता. तिने पोस्टमध्ये लिहले की, 'नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो’, असे वादग्रस्त लिखाण तिने केले होते. त्यानंतर मुंबईतील स्वप्निल जगताप या आंबेडकरी कार्यकर्त्याने तक्रार केली होती. त्यानुसार तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Ketaki Chitale
केतकी चितळे फेसबुक पोस्ट

'आजारपणावरुन टीका करत असाल तर...' - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केतकी चितळेवर निशाणा साधला आहे. केतकी इतकी विकृत असले वाटले नव्हते. तिने काय लिहले आहे हे जरा वाचा तुमच्या आजोबांबद्दल वडिलांबद्दल असा कोणी लिहले तर काय वाटेल याचाही विचार करा. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांत पाटील हे शरद पवारांवर राजकीय टीका करतात. त्याला आम्हीदेखील उत्तरे देतो. शरद पवारांवर राजकीयदृष्ट्या टीका करा. पण, त्यांच्या आजारपणावरुन टीका करत असाल आणि आमच्या कार्यकर्त्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्यास तुम्हाला काही बोलता येणार नाही. जीवे मारण्याची धमकी देऊन, विखारी टीका करून उंदिरासारखे का पळून जाताय, असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

'जे विषारी बाळ कडू...' - राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केतकीच्या पोस्टवरुन संघावर निशाणा साधला आहे. केतकी चितळे असो अथवा शरद पवारांनी जीवे मारण्याबाबत ट्विट करणारा भामरे असेल. त्यांना लहानपणी संघाच्या शाखेत जे विषारी बाळ कडू मिळाले त्याची ही उदाहरण असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

'तिच्याच संस्कारात चांगला चोप देण्यात येणार' - केतकीने हा जो काही खोडसाळ पणा केला आहे. तिला तिच्याच भाषेत, तिच्याच संस्कारात चांगला चोप देण्यात येणार आहे. पहिली गोष्ट शरद पवार यांच्याबद्दल बोलण्याची तिची पात्रता नाही. ती जे काही बोललेही आहे, तिला कोणाताही अर्थ नाही. मात्र, त्यामुळे आमच्या सारख्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याच्याबद्दल तिला चांगल्या चार पाच चापटी मिळाल्या ना, ती तिच्या आजारातून लवकर बरी होईल, असा इशाराही रुपाली पाटील-ठोंबरे यांनी दिला आहे.

कळवा, पुण्यात केतकीवर गुन्हा दाखल - केतकी चितळेने केलेल्या फेसबुक पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. केतकीवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 500, 505(2), 501 आणि 153 A हा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पुण्यातही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Ketaki Chitale Controversy : 'केतकीला चोप देणार, तेव्हाच तिची अक्कल ठिकाण्यावर येईल'

Last Updated : May 14, 2022, 5:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.