ETV Bharat / city

NIA Raids In Mumbai : एनआयएने ताब्यात घेतलेले सलीम फ्रूट आणि सुहेल खंडवानी कोण आहेत? वाचा सविस्तर....

दाऊद इब्राहिमच्या ( NIA Raids In Mumbai ) संबंधित व्यक्तींविरोधात आज मुंबईत विविध 20 ठिकाणी एनआयएने छापेमारी केली आहे. या छापेमारीमध्ये दाऊदचा साथीदार छोटा शकील ( Chhota Shakil ), जावेद चिकना ( Jaweb Chikna ), टायगर मेनन ( Tiger Menon ), इक्बाल मिर्ची ( Iqbal Mirchi ), दाऊदची बहीण हसीना पारकर यांच्याशी संबंधित व्यक्ती आणि नातेवाईक यांचा समावेश आहे.

NIA Raids In Mumbai
NIA Raids In Mumbai
author img

By

Published : May 9, 2022, 7:03 PM IST

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ( NIA Raids In Mumbai ) संबंधित व्यक्तींविरोधात आज मुंबईत विविध 20 ठिकाणी एनआयएने छापेमारी केली आहे. या छापेमारीमध्ये दाऊदचा साथीदार छोटा शकील ( Chhota Shakil ), जावेद चिकना ( Jaweb Chikna ), टायगर मेनन ( Tiger Menon ), इक्बाल मिर्ची ( Iqbal Mirchi ), दाऊदची बहीण हसीना पारकर यांच्याशी संबंधित व्यक्ती आणि नातेवाईक यांचा समावेश आहे. आज केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत एनआयएने येणे सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये छोटा शकीलचे नातेवाईक सलीम फ्रूट, माहीम आणि हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सुहैल खंडवानी, चित्रपट निर्माता समीर हिंगोरा, अब्हुल कयूम याच्यासह आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, त्यांचे नाव अद्याप कळू शकले नाही. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रकरणाशी संबंधित चौकशी NIA कडून सुरू आहे.

कोण आहे सलीम फ्रुट? - सलीम फ्रुट हा छोटा शकीलचा मेहुणा आहे. शकील आपल्या गुंडांच्या माध्यमातून खंडणीचे रॅकेट चालवतो. सलीम फ्रुटला 2006मध्ये युएईमधून भारतात पाठवण्यात आले होते आणि 2010 पासून तो तुरुंगात होता. सलीम फ्रुट याची या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. सलीम फ्रूट याचा जबाब नोंदविल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. सलीम फ्रुटशिवाय दाऊद इब्राहिमचा मेहुणा सौद युसूफ तुंगेकर, दाऊदचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरचा साथीदार खालिद उस्मान शेख आणि दाऊदची दिवंगत बहीण हसिना पारकरचा मुलगा आलीशान पारकर यांचेही जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. सलीम फ्रुटविरोधात मुंबईतील अनेक पोलीस स्टेशनमध्ये खंडणीच्या आरोपाखाली सहा गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांत चीन, बँकॉक, सौदी अरेबिया, श्रीलंका आणि तुर्कस्तानसह किमान 17 ते 18 देशात सलीम फ्रुट जाऊन आला आहे.

सुहेल खांडवानी कनेक्शन काय? - अंमलबजावणी संचलनलयाच्या अटकेत असलेले महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा साथीदार सुहेल खांडवानी याच्या घरावर एनआयएने छापा टाकला आहे. सुहेल खांडवानी हा मुंबईतील माहिम आणि हाजी अली दर्ग्याचा विश्वस्त आहे. माहिममधील त्याच्या घरी पहाटेपासूनच छापेमारी सुरु आहे. याशिवाय मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित तिघांच्या ठिकाण्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या धाडी सुरु असल्याची माहिती आहे. सुहेल खंडवानी हा टचवूड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक आहे. नवाब मलिकांचा मुलगा फराझ मलिक हाही या कंपनीत 2006 ते 2016 या काळात संचालक होता. टचवूड कंपनी आणि कांडल्याची असोसिएट हायप्रेशर टेक्वॉलॉजी कंपनीने बीकेसी भागात 200 कोटींची जमीन खरेदी केली होती.

समीर हिंगोरा कोण? - या छाप्यात समीर हिंगोरा याचे नाव समोर आले आहे. सध्या NIAने समीर हिंगोरा याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. समीर हिंगोरा हा तो व्यक्ती आहे. ज्याने संजय दत्तला AK-56 रायफल दिली होती. संजय दत्तला शस्त्रे देण्यात या व्यक्तीची महत्त्वाची भूमिका होती. संजय दत्तला समीर हिंगोरा याच्या वाहनातून AK-56 पाठवण्यात आली होती. या प्रकरणी टाडा न्यायालयाने समीर हिंगोरा याला 9 वर्षांची शिक्षाही सुनावली होती. समीर हिंगोरा हा व्यवसायाने चित्रपट निर्माता आहे.

अब्हुल कयूम कोण आहे? - एनआयने आज सकाळपासून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या जवळच्या व्यक्तींना विरोधात कारवाई सुरू केली आहे. मुंबईतील ग्रँड रोड परिसरातील अब्हुल कयूम याला आज येणार याने ताब्यात घेतले आहे. 1993 च्या मुंबईतील बॉंबस्फोट प्रकरणात येणे तपास करत आहे. तसेच अब्दुल प्रयोग याचा संबंध समोर आल्याने त्याला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - Bomb Blast Case : हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सुहैल खंडवानीं एनआयएच्या ताब्यात, 1993 च्या बॉम्बस्फोटप्रकरणी चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.