मुंबई - देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी एक कॉल केला आणि सर्वच काही बदललं. फक्त एक फोन कॉल आणि भेटण्याची ऑफर, जे काही होतं ते बघून स्टार्टअपचं नशीबच पालटलं. आज हे स्टार्टअप उंचीवर आहे. ही कोणत्याही चित्रपटाची कथा नसून वस्तुस्थिती आहे. टाटा समूहाची गुंतवणूक असलेल्या स्टार्टअप 'रेपोस एनर्जी' ने अलीकडेच मोबाईल इलेक्ट्रिक चार्जिंग वाहन लाँच केले आहे.
रतन टाटा यांचे मार्गदर्शन मिळावे एक स्वप्न! - रतन टाटा यांनी गुंतवणूक केलेल्या पुणे स्थित मोबाइल ऊर्जा वितरण स्टार्टअप रेपोस एनर्जीने अलीकडेच सेंद्रिय कचऱ्यावर चालणारे 'मोबाइल इलेक्ट्रिक चार्जिंग व्हेईकल' लाँच केले आहे. स्टार्टअपच्या संस्थापक आदिती भोसले वाळुंज आणि चेतन वाळुंज यांनी त्यांचे सुरुवातीचे दिवस सांगितले. रतन टाटा यांच्या एका फोन कॉलने त्यांचे नशीब कसे बदलले, ते त्यांनी सांगितले आहे. या फोन कॉलपूर्वी दोघांचेही स्वप्न होते, की आपल्या कंपनीला टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे मार्गदर्शन मिळावे. रेपोस एनर्जीच्या संस्थापक अदिती भोसले वाळुंज यांनी त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईलवर एक पोस्ट शेअर केली आहे. अदिती यांनी लिहिले की, जेव्हा मी आणि चेतनने स्टार्टअप सुरू केले, तेव्हा मी म्हणाले होते. रतन टाटा यांचे यासाठी मार्गदर्शक असल्यास चांगले होईल. यावर सर्वांनी त्यांना भेटणे अशक्य असल्याचे सांगितले होते.
१२ तास घराबाहेर थांबलो - रतन टाटा यांना पत्रासह हे सादरीकरण पाठवले. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आदिती आणि चेतन त्यांना भेटण्यासाठी रतन टाटा यांच्या घरी पोहोचले. दोघेही जवळपास १२ तास घराबाहेर थांबले. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही आणि दोघेही थकून परतले. अदिती यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांची प्रतीक्षा व्यर्थ गेली नाही, आम्ही हॉटेलमध्ये परत आलो. तेव्हाच एक फोन आला. मी फोन उचलला तर पलीकडून आवाज आला 'हॅलो, मी अदितीशी बोलू शकतो का ?' अदितीच्या म्हणण्यानुसार, तुम्ही कोण बोलतंय म्हटल्यावर समोरून आवाज आला, मी रतन टाटा बोलतोय, मला तुमचं पत्र आलंय, भेटू शकतो का ?
अखेर तो क्षण आलाच! - अदिती म्हणाल्या की हाच तो क्षण होता, जेव्हा तिचे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण होत होते. दुसऱ्या दिवशी अदिती आणि चेतन टाटा ग्रुपच्या चेअरमन रतना टाटा यांना भेटले आणि त्यांचा प्लान सांगितला. अदिती म्हणाल्या, 3 तास चाललेल्या बैठकीत आम्ही आमचे काम आणि ध्येय सांगितले. यानंतर टाटा समूहाकडून पहिली गुंतवणूक २०१९ मध्ये आणि दुसरी गुंतवणूक २०२२ मध्ये मिळाली. त्यांनी त्यांच्या व्यावसायिक प्रवासाचे वर्णन "धैर्य आणि उत्कटतेची कहाणी" असे केले आहे.
हेही वाचा - Azadi ka Amrit Mahotsav : स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी 'अमृत महोत्सवाचा' अनोखा उपक्रम