मुंबई : ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेला आर्यन खान आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या अनन्या पांडे या दोघांमधील कथित व्हाटसअॅप चॅटचा काही भाग समोर आला आहे. या दोघांमधील कथित चॅटचा काही भाग समोर आला असून यात दोघे कथितरित्या अमली पदार्थांविषयी चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे कथित चॅट एनसीबीने कोर्टात सादर केले आहे.
हे चॅट 2019 मधील असल्याचे सांगितले जात आहे. या चॅटमध्ये अनन्या आणि आर्यन कथितरित्या अमली पदार्थांविषयी चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ईटीव्ही भारत या चॅटची पुष्टी करत नाही.
नेमकं प्रकरण काय?
ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानच्या व्हाटस अॅप चॅटमध्ये अनन्या पांडेसोबत तो अमली पदार्थांविषयी बोलत असल्याचे समोर आल्यानंतर एनसीबीने अनन्याला चौकशीसाठी बोलाविले होते. या दोघांमधील संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टातही सादर केला आहे.