ETV Bharat / city

Genome Sequencing : जाणून घ्या... कोरोना आणि जीनोम सिक्वेंसिंग चाचणीतील फरक

author img

By

Published : Dec 9, 2021, 5:34 PM IST

Updated : Dec 9, 2021, 5:52 PM IST

गेले दोन वर्षे कोरोना चाचण्या हा शब्द प्रत्येकाने ऐकला आहे. मात्र आता कोरोनाचे जस जसे नवीन व्हेरियंट समोर येत आहेत. तस तसे चाचण्यांच्या बाबतीतही नवीन शब्द लोकांच्या कानावर पडू लागले आहेत. कोरोना विषाणूची लागण झाल्यावर कोणती चाचणी करतात आणि जीनोम सिक्वेंसिंग चाचण्या ( Genome Sequencing Test ) केव्हा करतात. जाणून घेऊया याबाबत सविस्तर....

Genome Sequencing
कोरोना आणि जीनोम सिक्वेंसिंग चाचणीतील फरक

मुंबई - गेले दोन वर्षे कोरोना चाचण्या हा शब्द प्रत्येकाने ऐकला आहे. मात्र आता कोरोनाचे जस जसे नवीन व्हेरियंट समोर येत आहेत. तस तसे चाचण्यांच्या बाबतीतही नवीन शब्द लोकांच्या कानावर पडू लागले आहेत. कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर यावी यासाठी आरटीपीसीआर ( रिवर्स ट्रांसक्रिप्शन पॉलीमर्स चेन रिएक्शन (Reverse Transcription Polymerase Chain Reaction) ) तसेच अँटीजेन चाचण्या केल्या जातात. तर रुग्णाला नेमक्या कोणत्या प्रकारच्या कोरोना विषाणूच्या प्रकारची लागण झाली आहे. हे जीनोम सिक्वेंसिंग चाचण्यांमधून ( Genome Sequencing Test ) समोर येते.

कोरोना चाचण्या -

देशभरात गेली पावणे दोन वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार सुरू आहे. हा प्रसार सुरु होण्याआधीपासून परदेशातून आलेले आणि त्यांच्या सहवासात आलेल्या नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे का? हे तपासण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या करण्यास सुरुवात केली. आरटीपीसीआर चाचण्यांचे नमुने सुरुवातीला पुण्याच्या एनआयव्ही या प्रयोगशाळेकडे पाठवले जात होते. देशभरातून या प्रयोग शाळेकडे नमुने येत असल्याने सुरुवातीला तीन ते चार दिवसांनी अहवाल येत होता. पुढे हा कालावधी कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयात तसेच आपल्या काही रुग्णालयात चाचण्यांसाठी लागणारी यंत्र मागवून चाचणी केंद्र सुरु केली आहेत. यामुळे मुंबईमध्ये अहवाल काही ठिकाणी काही तासात तर काही ठिकाणी एका दिवसात मिळू लागला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल यायला वेळ लागत असल्याने अँटीजेन चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांचा अहवाल अवघ्या १५ मिनिटात येतो.

पुण्यात जीनोम सिक्वेंसिंग चाचण्या -

भारतात गेले पावणे दोन वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार सुरु असतानाच या विषाणूने आपल्यात अनेकवेळा बदल घडवून आणले आहेत. विषाणूमध्ये होणाऱ्या बदलाची माहिती पुण्याच्या एनआयव्ही या संस्थेमधील चाचण्यांमधून समोर येत होती. या प्रयोगशाळेत मुंबईमधून आठवड्याला ५० सॅम्पल पाठवले जात होते. पुण्याच्या प्रयोगशाळेमध्ये देशभरातून सॅम्पल येत असल्याने अहवाल यायला उशीर लागत होता. दीड ते दोन महिन्याच्या कालावधीने अहवाल येत असल्याने तो पर्यंत रुग्ण बरा झाला असायचा किंवा त्याचा मृत्यू झाला असलायचा. तसेच विषाणूचा प्रसार किती प्रमाणात झाला याची माहिती मिळण्यास उशीर होत होता. यामुळे वेळीच उपचार करणे शक्य नव्हते.

कस्तुरबा रुग्णालयात लॅब -

पुण्याच्या एनआयव्हीकडून अहवाल येण्यास उशीर होत असल्याने पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जीनोम सिक्वेंसिंग करण्यासाठी प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे. याआधी याच प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. त्यात आता जीनोम सिक्वेंसिंग चाचण्या केल्या जात आहेत. या सुविधेमुळे दीड ते दोन महिने अहवाल येण्यास लागणारा कालावधी कमी होऊन तीन ते चार दिवसात अहवाल येत आहे. तीन दिवसात अहवाल आल्याने रुग्णावर त्वरित उपचार करणे आणि उपाययोजना करणे शक्य होत आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

काय आहे जीनोम सिक्वेंसिंग -

मुंबईत जे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत त्यापैकी विविध विभागातील ५० रुग्णांचे सॅम्पल पुण्याच्या एनआयव्ही म्हणजेच नॅशनल वायरॉलॉजी इन्स्टिट्यूटकडे जीनोम सिक्वेन्ससाठी पाठवले जायचे. या सॅम्पलचा अहवाल एक ते दीड महिन्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला पाठवला जातो. या चाचणीच्या अहवालामधून विषाणूमध्ये बदल झाला आहे का ? म्हणजेच त्याचे म्युटेशन झाले आहे का याची माहिती तसेच रुग्णाला कोणत्या प्रकारच्या कोरोनाची लागण झाली आहे. शहरात ही लागण इतरही रुग्णांना झाली आहे का याची माहिती मिळते त्यावरून उपाययोजना करण्यात येतात अशी माहिती मुंबई महापालिकेच अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

राज्यात दोनच ठिकाणी जीनोम सिक्वेंसिंग चाचण्या -

राज्यात कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यावर कोरोना चाचण्या आणि विषाणूमध्ये झालेला बदल पुण्याच्या एनआयव्ही म्हणजेच नॅशनल वायरॉलॉजी इन्स्टिट्यूटकडे पाठवण्यात आलेल्या नमुन्यामधून समोर येते. मात्र आता मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जीनोम सिक्वेंसिंग चाचण्या केल्या जात आहेत. राज्यात पुण्यात आणि मुंबई अशा दोन ठिकाणी जीनोम सिक्वेंसिंग चाचण्या केल्या जातात.

हेही वाचा - Omicron Variant : ओमायक्रॉनची भीती नसावी, परंतु काळजी घेणे महत्त्वाचे - डॉ. उदय बोधनकर

हेही वाचा - Shelar Vs Pednekar : आशिष शेलारांना गप्प करण्यासाठीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला - देवेंद्र फडणवीस

Last Updated : Dec 9, 2021, 5:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.