ETV Bharat / city

लोअर परळ  कारशेडमध्ये ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी - drone for Mosquitoes Control

दोन ड्रोनचा वापर केला आहे. एका ड्रोनने डास, कीटक कुठे लपले आहेत, याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या ड्रोनने फवारणी करण्यात आली. रेल्वेच्या कारशेडमध्ये तब्बल ५०० मीटर उंच आणि आठवडाभर हे फवारणीचे काम सुरू होते

dron used railway
लोअर परेल कारशेडमध्ये ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी
author img

By

Published : Jul 15, 2020, 11:02 AM IST

मुंबई - आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पश्चिम रेल्वेने पावसाळ्यातील डासांचा प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी करण्यासाठी लोअर परळ कारशेडमध्ये भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच ड्रोनचा वापर केला आहे. ड्रोनच्या माध्यमातून कारशेडमध्ये फवारणी करण्यात आली आहे.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात डासांचा फैलाव होतो. मात्र, काही डास उत्पत्ती होणाऱ्या काही ठिकाणांवर प्रतिबंधक उपायोजना कमी करणे अश्यक होते, अशा ठिकाणी आता डासांचा नायनाट करण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात आली. यासाठी दोन ड्रोनचा वापर केला आहे. एका ड्रोनने डास, कीटक कुठे लपले आहेत, याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या ड्रोनने फवारणी करण्यात आली. रेल्वेच्या कारशेडमध्ये तब्बल ५०० मीटर उंच आणि आठवडाभर हे फवारणीचे काम सुरू होते. यामुळे कारशेडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निरोगी व सुरक्षित वातावरणात काम करता येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

लोअर परेल कारशेडमध्ये ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी

लोअर परळ कारखाना भौगोलिक दृष्ट्या मुंबईच्या सखल भागात असल्याने दरवर्षी पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे हा कारशेड व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी एक कार्य प्रणाली तयार केली जाते. ज्यात अंतर्गत रूफ टॉप, अंतर्गत नाले आदींच्या स्वच्छतेचा समावेश आहे. याव्यतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप लावण्यात आले आहे. सामान्यतः रेल्वे कारशेडमध्ये धूर करून किंवा हाताच्या पंपाने कीटकनाशक फवारणी केली जाते.

ड्रोन सारखा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी कौतुक केले आहे. तसेच आलोक कंसल यांनी लोअर परेल कारशेडचे मुख्य कारखाना प्रबंधक ल तरुण हुरिया आणि उप मुख्य यांत्रिक अभियंता बी.एन. गंगवार आणि अरुण कुमार सिंह यांच्यासह संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.