मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात राज्यात पावसाने अनेक विभागात चांगलीच हजेरी लावली. यातच आता हवामान विभागाकडून पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा Warning of heavy rains in Maharashtra देण्यात आला आहे. थोडीफार उघडीप घेतलेला पाऊस आता पुन्हा जोरदार बरसण्याची शक्यता आहे. मधल्या काळात लातूर, बीड, नाशिक, परभणी जिल्ह्यातही पाऊस पडला. आता हवामान विभागाकडून पश्चिम महाराष्ट्रासह, मराठा, विदर्भाला सतर्कतेचा इशारा Meteorological department alert warning देण्यात आला आहे.
मधले काही दिवस पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. त्यामुळे पीकांना ओढ बसली अनेक भागातील पिके करपण्यास सुरुवात झाली होती. बळीराजा पावसाची अतुरतेने वाट पाहत होता. त्यातच वरुणराजाने मधे अनेक भागात हजेरी लावली काही भागात मुसळधार पाऊस कोसळला. येत्या काही दिवसांत पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने हजेरी लावली. याचबरोबर मराठवाड्यातील लातूर, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातही चांगलाच पाऊस पडला. पावसाने काही भागात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर काही भागात अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.
या पावसाळ्यात राज्यभरात चांगला पाऊस झाला आहे एकही जिल्ह्यात पावसाची तुट दिसलेली नाही. दरम्यान, येत्या गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, आज पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्या नुसार, पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर गुरुवारपासून पावसाचा जोर आणखीणच वाढणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
हेही वाचा : IT Professionals Tractor Ride : आयटी कर्मचाऱ्यांचा ऑफिसला जाण्यासाठी चक्क ट्रॅक्टरने प्रवास