ETV Bharat / city

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढला, आज मुसळधार कोसळण्याची शक्यता

author img

By

Published : Jun 20, 2022, 9:20 AM IST

मुंबईत आज मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज सायंकाळी समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला असून यावेळी ४.२२ मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. तसेच मंगळवारी पहाटे ५.२७ वाजता ३.४८ मीटरच्या लाटा उसळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Heavy Rain Will Be Come In Mumbai
मुंबईत पावसाचा जोर वाढला, आज मुसळधार कोसळण्याची शक्यता

मुंबई - शहरात ११ जूनला हजेरी लावल्यानंतर पावसाने दडी मारली होती. मात्र रविवारपासून मुंबईत विशेष करुन शहर विभागात पावसाने जोर पकडला आहे. मुंबईत आज ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान कफपरेड येथे झाड, तर चेंबूरला दरड कोसळल्याची घटना रविवारी घडली होती.

इतका पडला पाऊस - मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ या २४ तासात शहर विभागात ४३.०१ मिलिमीटर, पश्चिम उपनगरात १५.३९ मिलिमीटर तर पूर्व उपनगरात १०.२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शहर विभागात २२.६४ मिलिमीटर, पश्चिम उपनगरात ८.१ मिलिमीटर तर पूर्व उपनगरात ५.५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर रविवारी रात्री ११ ते आज पहाटे ६ वाजेपर्यंत शहर विभागात १२.४९ मिलिमीटर, पश्चिम उपनगरात ३.६५ मिलिमीटर तर पूर्व उपनगरात ४.८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

समुद्राला मोठी भरती - आज सायंकाळी ५ वाजता समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून यावेळी ४.२२ मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. तसेच मंगळवारी पहाटे ५.२७ वाजता ३.४८ मीटरच्या लाटा उसळू शकतात. आज समुद्रात मोठ्या लाटा उसळणार असल्याने नागरिक आणि पर्यटकांनी समुद्रात किंवा समुद्र किनारी जाऊ नका, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पाणी तुंबण्याच्या ठिकाणी 'ही' व्यवस्था - मुंबईत ३८६ फ्लडिंग पॉईंट्स होते, त्यापैकी यंदा २८२ फ्लडिंग पॉईंट्स कमी झाले आहेत. तर १०४ फ्लडिंग पॉईंट्स असून त्यापैकी ३० फ्लडिंग पॉईंट्स जवळ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उर्वरित ७१ ठिकाणी उपाययोजना करण्यात येत असून पुढील दोन वर्षांत ७१ फ्लडिंग पॉईंट्स पूरमुक्त होतील. यंदा पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा उपसा करण्यासाठी ४७७ पंप कार्यरत असतील. हिंदमाता परिसर पाण्याखाली जाऊ नये, यासाठी भूमिगत टाक्या बसवल्या असून ३ कोटी लिटर पाणीसाठा होऊ शकतो. पावसाचे पाणी साचल्यामुळे पूर आल्यास एनडीआरएफ, नौदल तैनात करण्यात आले आहे.

दरड कोसळून दोघे गंभीर - चेंबूर येथील भीमनगर, आरसीएफ वाशी नाका येथे रविवारी सकाळी घरावर दरड कोसळली. या दुर्घटनेत दोघेजण जखमी झाले असून अरविंद प्रजापती (वय 25 वर्षे), आशिष प्रजापती (वय 20 वर्षे), अशी जखमींची नावे आहेत. या दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू असून या दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.