ETV Bharat / city

आमची हक्काची जागा कोणालाही देणार नाही; संभाजीराजेंच्या उमेदवारीवर राऊतांची प्रतिक्रिया

राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी सध्या महाराष्ट्रात मोठे घमासान सुरू आहे. छत्रपती घराण्याचा सन्मान करत संभाजी राजेंना पाठिंबा द्यावा अशी मागणी भाजप व इतर मराठा संघटनाकडून करण्यात येत आहे. तर, आमच्या हक्काची सहावी जागा आम्ही इतर कोणालाही देणार नाही या निर्णयावर शिवसेना अद्यापही ठाम आहे. यावर आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून 'राजेंचा विषय आता आमच्यासाठी संपला आहे' असं राऊत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : May 25, 2022, 3:11 PM IST

Updated : May 25, 2022, 4:41 PM IST

मुंबई - राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी सध्या महाराष्ट्रात मोठे घमासान सुरू आहे. छत्रपती घराण्याचा सन्मान करत संभाजी राजेंना पाठिंबा द्यावा अशी मागणी भाजप व इतर मराठा संघटनाकडून करण्यात येत आहे. तर, आमच्या हक्काची सहावी जागा आम्ही इतर कोणालाही देणार नाही या निर्णयावर शिवसेना अद्यापही ठाम आहे. यावर आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून 'राजेंचा विषय आता आमच्यासाठी संपला आहे' असं राऊत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत
'विषय संपला' - राऊत म्हणाले की, "संभाजी राजे यांचा विषय आमच्यासाठी संपला आहे. आता संजय पवार हाच आमचा उमेदवार आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास छत्रपतींच्या कुटूंबाना वावड असण्याचे कारण नाही. या पूर्वी सुद्धा थोरले शाहू महाराज जे आमचे आदरणीय आहेत. त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी देखील काँग्रेस कडून निवडणूक लढवली होती. मालोजी राजे भोसले यांनी देखील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढली होती असा दाखला राऊत यांनी दिला आहे.

स्वतः युवराज छत्रपती संभाजी राष्ट्रवादीमधून निवडणूक लढले आणि पराभूत झाले. त्यामुळे राजकीय पक्षात छत्रपती यांच्या घराण्यातील कोणी जात नाही हा जो दावा त्यांच्या समर्थकांचा आहे तो चुकीचा आहे. देशभरात अनेक प्रमुख घराणे हे कुठल्या ना कुठल्या पक्षात काम करत आहे. त्यांना राज्य सभेत पाठवण्याचे उद्धव ठाकरे यांनी नक्की केले होते. त्या संधार्भात चर्चा देखील झाली होती असही राऊत म्हणाले आहेत.

माझा व्यक्तिगत संबंध काय? - संभाजी राजे प्रकरणावरून या सगळ्याचे परिणाम संजय राऊत आणि शिवसेनेला भोगावे लागतील असा इशारा मराठा संघटनांनी दिला आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "संजय राऊतचा यामध्ये व्यक्तिगत संबंद काय? आणि शिवसेनेचा देखील काय संबंध आहे? जे आशा प्रकारची वक्तव्य करत आहे ते गेल्या 15 दिवसामधील घडामोडी समजावून घेतल्या पाहिजेत असही ते म्हणाले आहेत.

शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा आम्ही संभाजी राजे यांना देण्यास तयार झालो होतो. ते छत्रपतींचा सन्मान राखण्यासाठीच त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी या पेक्षा शिवसेना काय करू शकते? हे त्यांनी सांगावे. 42 मतांचा कोटा लागतो तो आम्ही संभाजी राजे यांना देण्यास तयार आहोत. जागा शिवसेनेची आपण शिवसेनेचे उमेदवार व्हा. ही आमची भूमिका होती, अट नाही." असं राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या संभाजीराजे प्रकरणावर आता भाजप व मराठा संघटना नेमकी काय भूमिका घेतात? हे पहाण महत्त्वाचे आहे. कारण, महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा फॅक्टर नेहमीच निर्णायक राहिला आहे.

हेही वाचा - कपिल सिब्बल यांचा काँग्रेसचा राजीनामा, सपाच्या पाठिंब्याने राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

Last Updated : May 25, 2022, 4:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.