मुंबई - आम्ही मनपाचा अर्थसंकल्प हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर करत नाही, तर तो लोकाभिमुख सादर करतो असा टोला मुंबई महानगरपालिकेच्या महापौर यांनी मोदी सरकारला लगावला आहे. (Kishori Pednekar Comment On Union Budget 2022) काल (दि. 1 फेब्रुवारी)रोजी केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केला त्यावर प्रतिक्रिया देताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या. तसेच, उद्या गुरुवार (दि. 3 फेब्रुवारी)रोजी मुंबई महानगरपालिकेचा (BMC)चा अर्थसंकल्प सादर होणार आहे. (Budget for 2022-23) याबाबतही त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.
बीएमसी निवडणुकीसाठी शिवसेना पूर्णपणे सज्ज असून यावेळीही विजयी होईल
मुंबई हे एकमेव शहर आहे जिथे पाणथळ जागांसाठी स्वतंत्र बजेट आहे. आता राणी बागेत एकाच तिकीटात सगळ्यांना सर्व ठिकाणी फिरून पाहता येणार आहे. (Finance Minister Nirmala Sitharaman) 257 कोटी रुपये खर्च करून आफ्रिकन पेंगविन पार्क उभे केले आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
भातखळकरांनी तर सगळेच सोडलय
चित्रा वाघ कोण आहेत मला विचारणाऱ्या? मी गुजरातला जाऊन आले तर इथे सगळ्यांना उलट्या व्हायला लागल्या असा टोलाही पेडणेकर यांनी लगावला आहे. (Mumbai Mayor on Gujarat Penguin) भातखळकरांनी तर सगळेच सोडलय असही त्या म्हणाल्या आहेत. (Mumbai Rani Baug Penguin) दरम्यान, चित्रा वाघ यांनी नक्की बोलाव तुम्हाला भाजपने पक्षात त्या कामासाठीच घेतले आहे असाही टोला लगावला आहे.
मुंबईतील राणीच्या बागेत आणलेल्या पेनग्विनबाबत भाजपकडून जोरदार आरोप झाले. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर अहमदाबादमध्ये गेल्या त्यावरही मोठा गदारोळ झाला. अहमदाबादमध्ये आणलेल्या पेनग्विनची पाहणी करण्यासाठी महापौर गेल्या होत्या. गुजरातमधील पेनग्विन प्रकल्प, त्याचा खर्च किती, याचा आढावा महापौरांनी घेतला.
राणीबागेतील पेनग्विन पहाण्याचा तिकीटदर २५ ते ५० रुपये
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत: अहमदाबादेतील सायन्स सेंटरच्या पेनग्विन कक्षाला भेट देऊन अनेक महत्वाचे मुद्दे समोर आणलेत. राणीबागेतील पेनग्विन पहाण्याचा तिकीटदर २५ ते ५० रुपये तर अहमदाबादेतील पेनग्विन पाहण्याकरता ३०० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे आता राणीबागेचे पेनग्विन आणि अहमदाबादेचे पेनग्विन अशी तुलना सुरू झाली आहे. मुंबईत पेनग्विन प्रकल्पाचा खर्च हा 17 कोटी आला होता तर अहमदाबाद मध्ये 257 कोटी खर्च केला गेलाय. याबाबत महापौर लवकरच खुलासा करणार आहेत.
गुजरातमध्येही पेंग्विनला इंग्रजी नावे -
मुंबईच्या राणीबागेत पेनग्विनच्या पिलाला ऑस्कर हे नाव दिल्याने भाजपाने मराठी नाव का नाही असा प्रश्न करत शिवसेनेला लक्ष्य केले होते. गुजरातच्या अहमादाबाद येथील पेनग्विन पार्कमध्ये ५ अफ्रिकन पेनग्विन आहेत. त्यांची नावं सिमोन, पुंबा, नेमो, मुशू आणि स्वेन अशी आहेत. इंग्रजी नावावरून शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या भाजपच्या राज्यातही पेनग्विनला इंग्रजीत नावे दिली आहेत. यामुळे पेंग्विनच्या खर्चासह नावावरूनही भाजपला चोख उत्तर दिले जाणार आहे.
हेही वाचा - लोकसभेसह राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज चर्चा; राहुल गांधी सरकारला घेरणार