ETV Bharat / city

आम्ही नाराज नाही, मंत्रिपद मिळालेल्यांविषयी आनंदीच, पंकजा मुंडेंनी दिले स्पष्टीकरण - ETV Bharat News

आपण पक्षावर नाराज नसल्याचे स्पष्ट करतानाच पक्षाच्या निर्णयावर आक्षेप नसल्याचे मुंडे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. समर्थकांमध्ये जी भावना आहे, ती प्रेमातून आहे. त्यांच्यासोबत चर्चा करावी लागेल असेही मुंडेंनी म्हटले आहे.

आम्ही नाराज नाही, मंत्रिपद मिळालेल्यांविषयी आनंदीच, पंकजा मुंडेंनी दिले स्पष्टीकरण

author img

By

Published : Jul 9, 2021, 1:49 PM IST

Updated : Jul 9, 2021, 5:28 PM IST

मुंबई : केंद्रीय मंत्रिमडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चांना पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. आपण पक्षावर नाराज नसल्याचे स्पष्ट करतानाच पक्षाच्या निर्णयावर आक्षेप नसल्याचे मुंडे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. समर्थकांमध्ये जी भावना आहे, ती प्रेमातून आहे. त्यांच्यासोबत चर्चा करावी लागेल असेही मुंडेंनी म्हटले आहे.

आम्ही नाराज नाही, मंत्रिपद मिळालेल्यांविषयी आनंदीच, पंकजा मुंडेंनी दिले स्पष्टीकरण

मंत्रिपद मिळालेले मुंडे साहेबांच्याच विचारांचे, त्यामुळे आनंदच

ज्यांना मंत्रिपद मिळाले आहे. ते मुंडे साहेबांच्याच विचारांचे आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाल्याने आनंदच आहे असेही पंकजांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील ओबीसी समाज नव्याने मंत्री झालेल्यांकडे आशेने पाहत आहे असेही त्या म्हणाल्या.

पुनर्वसन हा शब्द मान्य नाही

जो उध्वस्त होतो, त्याचे पुनर्वसन होते. माझ्या घरात पूर आलेला नाही. त्यामुळे मला पुनर्वसन हा शब्द मान्य नाही असे पंकजा मुंडे राजकीय पुनर्वसनाविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाल्या.

समर्थकांची समजूत काढणार

पक्षाच्या निर्णयावर मला आक्षेप नाही. मात्र समर्थकां जी भावना आहे, ती प्रेमातून आहे. याविषयी त्यांच्यासोबत चर्चा करावी लागेल. मात्र आम्हाला मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा कदापि नव्हती. त्यामुळे समर्थकांची प्रेमाने समजूत काढणार असल्याचेही पंकजा यावेळी म्हणाल्या.

ओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका नको

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका व्हायला नको अशी स्पष्ट भूमिका यावेळी पंकजा मुंडेंनी जाहीर केली. याशिवाय सामनाचा अग्रलेख वाचला नाही, त्यावर काही टिप्पणी करणार नाही असेही त्या म्हणाल्या. तर ईडी, सीबीआय या मोठ्या तपास संस्था आहे. त्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही असेही त्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाल्या.

हेही वाचा - भीमा-कोरेगाव हिंसाचार : चौकशी आयोगाकडून शरद पवारांचा जबाब नोंदविला जाणार

Last Updated : Jul 9, 2021, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.