ETV Bharat / city

Water Taxi Mumbai : प्रवाशांअभावी वॉटर टॅक्सीचे भविष्य अंधारात? टॅक्सीच्या मार्गात होणार बदल! - बेलापूर-एलिफंटा

वॉटर टॅक्सी बंद ठेवण्याची नामुष्की कंपनीवर आली आहे. परिणामी सोमवारी ते शुक्रवार बेलापूर-भाऊचा धक्का आणि शनिवार व रविवारी बेलापूर-एलिफंटा या मार्गांवर वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय गेटवे-एलिफंटा प्लिजर टूर अँड ट्रॅव्हल्स लिमिटेड’ने यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी ईटीव्ही भारताला दिली.

Water Taxi Mumbai
Water Taxi Mumbai
author img

By

Published : Feb 25, 2022, 10:22 AM IST

मुंबई - मुंबई आणि नवीमुंबई बेलापूर मार्गावर चालविणारी सर्वाधिक मोठी ५६ आसनी हायस्पीड वॉटर टॅक्सी प्रवासी मिळत नसल्याने अडचणीत सापडली आहेत. प्रवासी अभावी कंपनीला दररोज डिझेल खर्चासाठी दररोज ५० हजार रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे वॉटर टॅक्सी बंद ठेवण्याची नामुष्की कंपनीवर आली आहे. परिणामी सोमवारी ते शुक्रवार बेलापूर-भाऊचा धक्का आणि शनिवार व रविवारी बेलापूर-एलिफंटा या मार्गांवर वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय गेटवे-एलिफंटा प्लिजर टूर अँड ट्रॅव्हल्स लिमिटेड’ने यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी ईटीव्ही भारताला दिली.

कंपनीचा सदस्यांची तातडीने बैठक -

मुख्यमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते आठवड्याभरापूर्वी मोठ्या थाटा-माटात सुरु झालेल्या हायस्पीड वॉटर टॅक्सी सेवेला अद्यापही प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. नवी मुंबईच्या बेलापूर बंदरावरून सोमवारी सकाळी भाऊच्या धक्क्याच्या दिशेने ५६ आसनी वॉटर टॅक्सी सेवा सुरु झाली आहे. गेल्या तीन एकही प्रवासी या वॉटर टॅक्सीला मिळाला नसल्याने कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान होता आहे. एका फेरीसाठी २५ हजार रुपयांप्रमाणे दोन फेऱ्यांसाठी डिझेल खर्च म्हणून ५० हजार रुपये प्रति दिवस नुकसान वॉटर टॅक्सी कंपनीला होत आहे. त्यामुळे आज गेटवे-एलिफंटा प्लिजर टूर अँड ट्रॅव्हल्स लिमिटेड’ वॉटर टॅक्सी सेवा बंद करून कंपनीच्या सभासदांची तातडीची बैठक बोलविली होती. या बैठकीत कंपनीला नुकसान होऊ नयेत म्हणून, सोमवारी ते शुक्रवार बेलापूर-भाऊचा धक्का आणि शनिवार व रविवारी बेलापूर-एलिफंटा या मार्गांवर वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय गेटवे-एलिफंटा प्लिजर टूर अँड ट्रॅव्हल्स लिमिटेड’ घेतला आहेत.

बेलापूर-एलिफंटा मार्गाला पसंती -

बेलापूर ते भाऊचा धक्का बंदरापर्यंत जल वाहतुकीसाठी ५६ आसनी वॉटर टॅक्सीची किमंत सहा कोटी रुपये आहेत. बेलापूर ते भाऊचा धक्कापर्यतचा एका फेरीस २२ ते २५ हजार रुपयांचे डिझेल लागत आहे. याशिवाय तिकिट विक्री, नाविक आणि इतर असे मिळून सेवा सुरळीत ठेवण्यासाठी लागणाऱ्या एकूण १० कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी कंपनीला अधिकचा खर्च करावा लागत आहे. एवढा सर्व खर्च केल्यानंतर फेरीस फाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाला, तरीही २९० रुपये तिकिट असल्याने शासनास लेव्ही जमा केल्यानंतर जेमतेम १ ते २ हजार रुपये कंपनीच्या शिल्लकीत उरणार आहेत. त्यामुळे ही सेवा चालवणे कंपनीच्या फायद्याचे नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

असा आहे डिझेल खर्च -

बेलापूर ते एलिफंटा मार्गावर वॉटर टॅक्सीला सुमारे १५ हजार रुपयांचे डिझेल लागेल. त्यामुळे डिझेलच्या माध्यमातून सरासरी १० हजार रुपयांचा खर्च कमी होईल. सर्वसामान्य प्रवाशांना २९० रुपये तिकीट आकारत असताना पर्यटनासाठी तिकिटाची किंमत वाढवली, तर बेलापूर-भाऊचा धक्का मार्गाहून अधिक नफा बेलापूर-एलिफंटा मार्गावर कमावण्याची संधी कंपनीस मिळणार आहे.

तीन दिवस तोटा -

पहिल्या तीन दिवसांत सहा फेऱ्या चालवल्यानंतरही एकही प्रवासी मिळालेला नसल्याने कंपनीने आज वॉटर टॅक्सीची सेवा बंद ठेवली होती. परिणामी, मोठ्या गाजावाजा करत सुरु झालेली मुंबई व नवी मुंबईला जोडणारी ही जलवाहतुकीची सेवा तूर्तास तरी प्रवाशांच्या प्रतिसाअभावी बंद होण्याच्या मार्गावर दिसत आहे. तसेच मुंबई ते नवी मुंबई मार्गावर जल वाहतुकीचा आनंद लुटण्यासाठी कदाचित प्रवासी व पर्यटकांना हा शेवटचा आठवडा असू शकतो, असेही सूत्रांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.