ETV Bharat / city

मुंबईकरांचे पाणी महागणार; १६ जूनपासून होणार अंमलबजावणी

मुंबईत नोव्हेंबरपासून पाणी कपात लागू आहे. यामुळे मुंबईकरांना पाणी मिळत नसताना पाणी दरवाढ करणे योग्य नाही, असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले.

मुंबई महापालिका
author img

By

Published : Jun 13, 2019, 1:28 PM IST

मुंबई - मागील वर्षी पाऊस कमी पडल्याने १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यात आता मुंबईकरांना २.४८ टक्के पाणी दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. ही दरवाढ १६ जूनपासून लागू करण्यात येणार आहे.

विरोधी पक्ष नेते रवी राजा आणि पालिकेचे अधिकारी

भातसा, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, विहार आणि तुळशी या सातही धरणांतून मुंबईकरांना दररोज ३ हजार ८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणी चोरी आणि गळतीमुळे दररोज ८०० ते ९०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. महापालिकेकडून मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जातो, त्यासाठी खर्चात वाढ होत असल्याने २०१२ पासून दरवर्षी ८ टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. २०१७-१८ मध्ये जल विभागाला ८३६.६० कोटी खर्च आला होता. २०१८-१९ मध्ये त्यात वाढ होऊन हा खर्च ८५७.३२ कोटींवर गेला आहे. खर्चात २.४८ टक्के दरवाढ झाल्याने घरगुती आणि बिगर घरगुती ग्राहकांवर ही दरवाढ लागू केली जाणार आहे, अशी माहिती जलविभागाने स्थायी समितीत दिली. या दरवाढीला विरोधी पक्षांनी विरोध केला आहे.

मुंबईत नोव्हेंबरपासून १० टक्के पाणी कपात लागू आहे. मात्र, प्रत्यक्षात ४० टक्के पाणी कपात लागू आहे. यामुळे मुंबईकरांना पाणी मिळत नसताना पाणी दरवाढ करणे योग्य नाही, असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे.आधी मुंबईकरांना पाणी द्या मग दरवाढ करा, अशी मागणी राजा यांनी केली आहे. पाणीपट्टी वाढवली जाणार असल्याने मुंबईकरांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

  • नवी दरवाढ कशी असेल -

दरवाढीचे प्रकार जुने दर नवीन दर

  • घरगुती ३.८२ ३.९२
  • झोपडपट्टी ४.२३ ४.३३
  • इतर घरगुती ५.०९ ५.२२
  • व्यावसायिक संस्था ३८.२५ ३९.२०
  • थ्री स्टार हॉटेल ७६.४९ ७८.३९
  • पाणी कंपन्या १०६.२५ १०८.८९

Intro:मुंबई -
मुंबईत गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे त्यात आता मुंबईकरांना २.४८ टक्के पाणी दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. ही दरवाढ १६ जूनपासून लागू करण्यात येणार आहे.Body: भातसा, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, विहार व तुळशी या सातही धरणांतून मुंबईकरांना दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाणी चोरी व गळतीमुळे दररोज ८०० ते ९०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. महापालिकेकडून मुंबईकरांना पाणी पुरवठा केला जातो त्यासाठी खर्चात वाढ होत असल्याने २०१२ पासून दरवर्षी ८ टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. २०१७ - १८ मध्ये जल विभागाला ८३६.६० कोटी खर्च आला होता. २०१८ - १९ मध्ये त्यात वाढ होऊन हा खर्च ८५७.३२ कोटींवर गेला आहे. खर्चात २.४८ टक्के दरवाढ झाल्याने घरगुती आणि बिगर घरगुती ग्राहकांवर ही दरवाढ लागू केली जाणार आहे. अशी माहिती जलविभागाने स्थायी समितीत दिली. या दरवाढीला विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. मुंबईत नोव्हेंबर पासून १० टक्के पाणी कपात लागू आहे. मात्र प्रत्यक्षात ४० टक्के पाणी कपात लागू आहे. यामुळे मुंबईकरांना पाणी मिळत नसताना पाणी दरवाढ करणे योग्य नाही, असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे. आधी मुंबईकरांना पाणी द्या मग दरवाढ करा अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे. पाणीपट्टी वाढवली जाणार असल्याने मुंबईकरांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

नवी दरवाढ कशी असेल
जुने दर नवीन दर
घरगुती ३.८२ ३.९२
झोपडपट्टी ४.२३ ४.३३
इतर घरगुती ५.०९ ५.२२
व्यावसायिक संस्था ३८.२५ ३९.२०
थ्री स्टार हॉटेल ७६.४९ ७८.३९
पाणी कंपन्या १०६.२५ १०८.८९Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.