ETV Bharat / city

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी मुंबईत मतदानाला सुरुवात - मुंबई काँग्रेस

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मुंबईतील राजीव गांधी भवन आणि मुंबई काँग्रेस (mumbai congress) कार्यालयातील मुरली देवरा सभागृहामध्ये मतदान होणार असून मतदानाला सुरुवात झाली आहे. (Voting for Congress president)

Congress President Election
Congress President Election
author img

By

Published : Oct 17, 2022, 1:35 PM IST

Updated : Oct 17, 2022, 1:42 PM IST

मुंबई: तब्बल २२ वर्षांनी काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होते आहे. (Congress President Election). या निवडणुकीसाठी आज मुंबईतील राजीव गांधी भवन आणि मुंबई काँग्रेस (mumbai congress) कार्यालयातील मुरली देवरा सभागृहामध्ये मतदान होणार असून मतदानाला सुरवात झाली आहे. (Voting for Congress president).

काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निवडणूक प्राधिकरणाचे सदस्य बी. पी. सिंग, प्रवीण चक्रवर्ती, दिनेशकुमार, के. एल. पुनिया व नरेंद्र रावत यांनी काल मुंबई काँग्रेस कार्यालयाला भेट दिली आणि निवडणुकीच्या तयारीबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुंबईतील २३६ वॉर्डांमधून निवडून आलेले मुंबई काँग्रेसचे २३६ प्रदेश प्रतिनिधी (PCC) या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुंबईतील राजीव गांधी भवन मधील मुरली देवरा सभागृहात मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप यांनी मतदानाचा हक्क बजावला.

टिळक भवन येथे सुद्धा होणार मतदान: दादर येथील कॉंग्रेस मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सकाळी १० वाजता मतदानाचा हक्क बजावला. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे मतदानाचे केंद्र असून येथील तीन बूथवर सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत राज्यातील 561 प्रदेश प्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात. जे प्रदेश प्रतिनिधी मतदार आहेत, त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बारकोड असलेले ओळखपत्र दिलेले आहे. ही निवडणूक जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्यात होणार आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी केले आहे.

Last Updated : Oct 17, 2022, 1:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.