ETV Bharat / city

Voter List Linked Aadhar Card : देशातील मतदार याद्या 'आधार'शी जोडणार, निवडणूक आयोगाचा निर्णय

author img

By

Published : Jul 15, 2022, 9:06 PM IST

देशभरात असलेल्या दुबार मतदार याद्या दुरुस्त करण्यासाठी आणि दुबार नावे वगळण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आता मतदार यादीला आधार द्यायचे ठरवले आहे. त्यानुसार देशभरातील सर्व मतदार याद्या आधार क्रमांकाशी जोडल्या जाणार ( Voter List Linked Aadhar Card ) आहेत.

Aadhar Card
Aadhar Card

मुंबई - देशभरात असलेल्या दुबार मतदार याद्या दुरुस्त करण्यासाठी आणि दुबार नावे वगळण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आता मतदार यादीला आधार द्यायचे ठरवले आहे. त्यानुसार देशभरातील सर्व मतदार याद्या आधार क्रमांकाशी जोडल्या जाणार ( Voter List Linked Aadhar Card ) आहेत.

मतदार यादीमध्ये असलेली दुबार नावे आणि बोगस नोंदणी काढून टाकण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय स्तरावर मोठी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेंतर्गत यापुढे सर्व मतदारांची नावे आधार क्रमांकाची जोडली जाणार आहेत. त्यामुळे देशभरात एखाद्या मतदाराचे नाव एकदाच मतदार यादीत राहणार आहे.

राज्यात दहा लाख दुबार नावे - केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय स्तरावर सुरू केलेल्या या मोहिमेचा भाग म्हणून राज्यातही दुबार नावे तपासण्यात आली. यात केवळ महाराष्ट्रातच दहा लाख दुबार नावे आढळली आहेत. ही सर्व नावे आता मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. याच प्रमाणे अन्य राज्यांमध्ये ही मोहीम राबवली जात असून, त्या राज्यांमध्येही दुबार असलेली नावे वगळली जात असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.

अन्य राज्यातही मतदार यादीत नावे - मुंबईसारख्या शहरात देशभरातल्या विविध राज्यातून लोक नोकरी व्यवसायानिमित्त येत असतात. विशेषतः उत्तर प्रदेश बिहार या राज्यांमधून बहुसंख्य नागरिक मुंबईत स्थायिक झाले आहेत. मुंबईतील मतदार याद्यांमध्ये त्यांची नावे जोडली गेली, असताना त्यांच्या मूळ राज्यात असलेल्या मतदारसंघातही त्यांची नावे आहेत. हे मतदार दोन्ही ठिकाणी मतदान करत असल्याचे गेल्या काही वर्षांत सातत्याने समोर आले आहे. त्यासाठी मुंबईतील परप्रांतीय नेते मुंबईत स्थिरावलेल्या नागरिकांना प्रवास भाडे देऊन मतदानासाठी घेऊन जात असल्याची अनेक उदाहरणे समोर आली, अशी माहिती श्रीकांत देशपांडे यांनी दिली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा प्रकार अधिक घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

नवमतदारांना वर्षातून चार वेळा संधी - नव मतदारांना आपली मतदार नोंदणी करण्यासाठी यापूर्वी वर्षातून केवळ एकदाच संधी होती. त्यामुळे ही संधी हुकल्यानंतर अथवा या संधीपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण झाली नसती, तर संबंधित मतदाराला मतदार नोंदणी करण्यासाठी पुढील वर्षाची वाट पहावी लागत असे. मात्र, यात आता बदल केला असून दर तीन महिन्यांनी मतदारांना आपली नावे मतदार यादीत नोंदवता येणार आहेत.

एकाच राज्यात राहणार नाव - दुबार मतदानाचे प्रकार रोखण्यासाठी आता मतदान ओळखपत्राशी आधार जोडले जाणार आहे. दुबार नोंदणी असलेल्या मतदाराला आता कोणत्या राज्यामध्ये त्याला मतदान करायचे आहे. त्या राज्याच्या मतदान यादीत त्याचे नाव कायम केले जाणार आहे. तर अन्य राज्याच्या यादीतून नाव वगळले जाणार आहे. एप्रिल 2023 पर्यंत सर्व मतदारांचे मतदार ओळखपत्र आधारशी जोडले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 मध्ये सुधारणा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - Uddhav Thackeray : शिवसैनिकावर हल्ला, उद्धव ठाकरे संतापले; म्हणाले, 'जीवाशी येत असेल तर खपवून...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.