ETV Bharat / city

Shivsena Malvani Jatrotsav : अंधेरीत निर्बंध मोडत पालिकेच्या मैदानावरच मालवणी जत्रोत्सव - मालवणी जत्रोत्सव न्यूज

मुंबईत अंधेरी येथील डीएननगर भागात आयोजित मालवणी जत्रोत्सवात ( Shivsena Malvani Jatrotsav ) कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच हा मेळावा भरवला होता. नियम बनविणाऱ्या पालिकेच्या मैदानावरच हा जत्रोत्सव सुरू असल्याने आता काय कारवाई करणार असा प्रश्‍न विचारला जात आहे.

मालवणी जत्रोत्सव
Shivsena Malvani Jatrotsav
author img

By

Published : Jan 2, 2022, 8:45 AM IST

मुंबई - महाराष्ट्रासमोर कोरोना विषाणू (Corona) संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचं संकट उभं राहिलं आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारने नियम लादले आहेत. मात्र, नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. मुंबईत अंधेरी येथील डीएननगर भागात आयोजित मालवणी जत्रोत्सवात ( Shivsena Malvani Jatrotsav ) कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले.

मालवणी जत्रोत्सवात कोरोना नियमांचे उल्लंघन

मुंबईतील नियम तयार करण्याची जबाबदारी महानगर पालिकेवर आहे.मात्र,मुंबई महानगर पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) मैदानावरच मालवणी जत्रोत्सव सुरु असल्याचा खबळजनक प्रकार उघड झाला आहे. महापालिकेने कोरोनाच्या नियामात बदल केले आहेत. तरीही शिवसेना नेत्याच्या कार्यक्रमात नियम मोडले ( Violation of restrictions in Shivsena Malvani Jatrotsav ) जात आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच हा मेळावा भरवला होता. नियम बनविणाऱ्या पालिकेच्या मैदानावरच हा जत्रोत्सव सुरू असल्याने आता काय कारवाई करणार असा प्रश्‍न विचारला जात आहे.

ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली -

कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग पसरू नये, म्हणून अनेक राज्यांनी लॉकडाऊन, निर्बंध आणि नाईट कर्फ्यू लागू केला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातदेखील नाईट कर्फ्यू लागू करण्याची शक्यता आहे. तर तेलंगणामध्ये काही ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत.

नागरिकांनी भीती बाळगू नये -

ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात ( Coronavirus In Maharashtra ) आहेत. इतर राज्यातदेखील ओमायक्रॉनची रुग्ण दिसून येत आहेत. विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत नागरिकांनी भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात मास्क घालणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे, गर्दीत न जाणे या कोविड नियमांचे पालन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनी त्याची माहिती स्थानिक आरोग्य विभागास द्यावी, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

हेही वाचा - Pankaja Munde Corona Infected : माजी मंत्री पंकजा मुंडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, उपचार सुरु

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.