ETV Bharat / city

मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल - मराठा

न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के तर नोकरीत 13 टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. म्हणून विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे.

सर्वोच्च न्यायालय ( संग्रहित छायाचित्र )
author img

By

Published : Jun 28, 2019, 2:17 PM IST

मुंबई - उच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्रात एसईबीसीच्या अंतर्गत मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के तर नोकरीत 13 टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. यामुळे मराठा आरक्षणासाठी आज याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यावतीने अॅड. संदीप देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केली आहे.

Court
दाखल करण्यात आलेले कॅव्हेट

मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निर्णयानंतर याबाबत प्रतिक्रिया देताना विरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजित मोरे यांच्यावर आरोप केले. आजचा निर्णय हा न्यायदानाची शिस्त संपविणारा असल्याचे म्हणत थेट मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावरही गंभीर आरोप करत त्यांनी निशाणा साधला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती रणजित मोरे यांनी दिलेल्या निर्णयाची सीबीआय चौकशीची त्यांनी मागणी केली आहे.

याबाबत न्यायाधीश, मुख्यमंत्री, विनोद तावडे यांचे फोन कॉल तपासले जावेत, अशी मागणी अॅड सदावर्ते यांनी केली आहे. न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे हे माध्यमांसमोर येऊन निकाल त्यांच्या बाजूने येणार असल्याचे सांगतात. विनोद तावडे यांना न्यायालय काय निर्णय देणार आहे, हे कसे कळले याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व न्यायमूर्ती रणजित देशमुख यांनी मिळून संविधान पायदळी तुडविल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.

Intro:मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणसंदर्भात आलेल्या निकालानंतर महाराष्ट्रात एसईबीसी च्या अंतर्गत राज्यात मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के तर नोकरीत 13 टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग जरी मोकळा झाला असला तरी या उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्य न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते . याच कारणास्तव मराठा आरक्षणासाठी आज ( शुक्रवारी ) याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यावतीने अँड.संदीप देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केली आहे. Body:दरम्यान मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निर्णयानंतर या संदर्भात प्रतिक्रिया देताना विरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजित मोरे यांच्यावर आरोप करीत आजचा निर्णय हा न्यायदानाची शिस्त संपविणारा असल्याचे म्हणत थेट मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप करीत निशाणा साधला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती रणजित मोरे यांनी दिलेल्या निर्णयाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
Conclusion:या संदर्भात न्यायाधीश , मुख्यमंत्री , विनोद तावडे यांचे फोन कॉल तपासले जावेत अशी मागणी एड सदावर्ते यांनी केली आहे. न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे हे माध्यमांसमोर येऊन सांगतात की निकाल त्यांच्या बाजूने येणार आहे. विनोद तावडे यांना न्यायालय काय निर्णय देणार आहे हे कसे कळले याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व न्यायमूर्ती रणजित देशमुख यांनी मिळून संविधान पायदळी तुडविल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.