मुंबई शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते विनायक मेटे Vinayak Mete passed away यांचा आज दुर्दैवी अपघाती मृत्य झाला. आज मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेल जवळ हा अपघात झाला असून त्यांच्या अपघातानंतर राजकीत वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. उद्या बीड येथे त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी Cremation of Vinayak Mete held in Beed ठेवण्यात येणार आहे. आज दुपारी साडेचार मुंबईतील निवस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. तेथे अंत्यदर्शन झाल्यानंतर एम्ब्युलन्सने महामार्गाने त्यांचे पार्थिव बीड येथे असलेल्या त्यांच्या निवासस्थानी नेले जाणार आहे. त्यानंतर कळंबोली आणि तळेगाव इथे देखील त्यांच्या पार्थिवानला श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. तसेच चाकण, शिक्रापूर, नगर आणि टाकळी मार्गे त्यांना बीडच्या त्यांच्या निवासस्थानी पार्थिव घेऊन जाणार असल्याची माहिती आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. विनायक मेटे यांच्या मुंबई येथील निवस्थानी त्यांनी ही माहिती दिली.
'विनायक मेटे हे झपाटलेले कार्यकर्ते' : विनायक मेटे हे मराठा आरक्षणासाठी झपाटलेले नेते आणि कार्यकर्ते होते. गेली अनेक वर्षे विनायक मेटे हे राज्याच्या राजकारणात सहभागी आहेत. मात्र मराठा आरक्षण मुद्यावर त्यांनी अहोरात्र काम केलं आहे. आजही ते मराठा आरक्षणसाठी असलेल्या बैठकीसाठी मुंबईला यायला निघाले आणि हा अपघात झाला. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या चळवळीतील आज काळा दिवस असल्याचे मत काँग्रेचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केले आहे. तसेच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे. योग्यवेळी मेटे यांना मदत मिळाली असती तर त्यांना वाचवता येऊ शकले असते. मात्र आता द्रुतगती महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने मदत पोहचण्यासाठी शासनाने नव्या उओयोजना कराव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे भाई जगताप यावेळी म्हणाले.
हेही वाचा - Vinayak Mete Death शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे भीषण अपघातात निधन