मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील विविध पक्षातील नेत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भांडुप येथील त्यांच्या घरी भेट दिली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही राऊत यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना, त्यांनी राऊत यांची स्तुती केली. संजय राऊत हे महाराष्ट्रातील राजकारणातील हिरा आहेत, असे वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा... राज्यात भाजपचेच सरकार, मुख्यमंत्री आमचाच - चंद्रकांत पाटील
राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापन केली नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाची भूमिका संजय राऊत यांनी ठामपणे मांडली. यामुळे राज्यात नव्याने शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून एक फॉर्म्युला तयार होत आहे, त्यानुसार सरकार स्थापन करणार आहोत. यासाठी बैठका घेतल्या जात आहेत, असे वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा... BREAKING: मुख्यमंत्री निश्चितपणे शिवसेनेचा होणार - नवाब मलिक
संजय राऊत यांच्या भेटीनंतर वडेट्टीवार यांनी, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर आम्हाला आनंदच असेल. संजय राऊत यांचे आमच्याशी चांगले संबंध असून ते सर्वांचेच मित्र आहेत आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणातील हिरा असल्याचे वड्डेटीवार यांनी यावेळी म्हटले आहे.