ETV Bharat / city

Assembly Budget Session : शिवसेना आमदाराचा ठाकरे सरकारला घरचा आहेर - अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबतच्या ताज्या घडामोडी

live update
live update
author img

By

Published : Mar 2, 2021, 10:44 AM IST

Updated : Mar 2, 2021, 9:44 PM IST

16:56 March 02

येरा गबाळ्याचे काम नाही, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस बोलताना

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. कोश्यारींना सरकारनं दिलेलं भाषण एखादं चौकातलं भाषण वाटतं. त्यात यशोगाथाच नव्हे, केवळ आणि केवळ व्यथाच दिसतात, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. येर गबाळ्याचे काय काम; तुकोबांचा अभंग म्हणत फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

16:56 March 02

..नाहीतर विधानसभेच्या गॅलरीतून उडी मारेन - आमदार डॉ.संदीप धुर्वे

अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरत असून भ्रष्टाचारी अधिकाऱ्याचे निलंबन करावे, नाहीतर विधानसभेच्या गॅलरीतून उडी मारेन, अशी धमकी आमदार डॉ.संदीप धुर्वे यांनी दिली. यानंतर विधानसभेत एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी महाविकास आघाडीचे आमदार आणि विरोधी पक्षाचे आमदार यांच्यात घोषणाबाजी झाली. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना विनंती केली की सदस्य सभागृहात आत्महत्येची धमकी देत आहेत, हे योग्य नाही.

14:19 March 02

रामदास कदम यांचा शिवसेनेला घरचा आहेर

विधानपरिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या चर्चेवेळी शिवसेनेचे रामदास कदम यांनी , शिवसेनेच्याच मंत्र्यावर आरोप केले.रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये कोरोना प्रतिबंधक नियम डावलून विविध कार्यक्रमांना परवानगी देणाऱ्या आणि राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी कदम केली.

14:15 March 02

  • पूजा चव्हाण प्रकरणी १२ ऑडिओ क्लिपमधून व्हायरल झाले आहेत. त्यात थेट पुवावे आहेत. त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. तसेच वानवडी पोलिस स्टेशनचे अधिकारी यांना सस्पेंड केले पाहिजे.  मृत्यू होतो, अबॉर्शन झाले, असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, कारवाई अजूनही झाली नाही. या एकूणच प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली.

14:14 March 02

  • डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे फोन टॅप कोण करते आहे, याची चौकशी झाली पाहिजे - देवेंद्र फडणवीस

14:13 March 02

  • काही योजनांना बाळासाहेबांचे नाव दिले. मात्र, त्यांची अंमलबजावणी नाही - देवेंद्र फडणवीस

14:12 March 02

  • वीज कनेक्शन तोडण्याच्या प्रक्रियेला स्थगिती दिली, त्यासाठी उपमुख्यमंत्र्यांचे आभार - देवेंद्र फडणवीस

14:09 March 02

  • जलयुक्त शिवारचे नाव बदलले. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही - देवेंद्र फडणवीस

14:05 March 02

  • शेतकऱ्यांच्या घरी धान्य सडून गेले आहे. केंद्राने याबाबत कारवाई काय केली, असा प्रश्न विचारणाऱ्यांनी राज्यसरकारने काय केले ते सांगावे - देवेंद्र फडणवीस

13:21 March 02

  • कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी असून ३० हजार ९०० नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्रचा देशात सर्वात शेवटचा क्रमांक लागतो, असेही ते म्हणाले. मोठे हॉस्पिटल बनवले पण त्यात मोठा भ्रष्ठाचारही झाल्या असून १२०० रुपयांचे थर्मामिटर १२ हजारात खरेदी केले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

13:20 March 02

  • जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा भ्रष्ठाचार जंम्बो भ्रष्ठाचार झाला असून जंम्बो हॉस्पिटलचा किती जणांना लाभ झाला कोणाची घर भरली, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणीही फडणवीसांनी केली.

13:17 March 02

  • राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना त्यांच्या भाषणात यशोगाथा नाही, तर वेदनाच दिसतात , असा आरोपही फडणवीस यांनी केला.

13:01 March 02

कोरोना काळात राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार - देवेंद्र फडणवीस

  • विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला सुरूवात झाली असून या संदर्भात बोलताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी कोरोना काळात राज्यात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाल्याचा आरोप केला.
  • राज्यपाल हे पद महत्वाचे असून त्यांना विमान द्यायचे असेल तर ते राज्यपालांना द्यावे लागते. सरकारतर्फे रोज राज्यपालांना रोज अपमानित करण्यात येते आणि त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव येतो, त्याचा आनंद असल्याचेही फडणवीस म्हणाले. तसेच राज्यपालांना विमान न देणे हे कोतेपणाचे लक्षण असल्याचेही ते म्हणाले.

12:19 March 02

  • राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला सुरूवात

11:09 March 02

  • विधानपरिषदेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब

11:04 March 02

  • ऊर्जा विभागाची बैठक होत नाही तोपर्यंत वीजकनेक्शन तोडण्याला स्थगिती; अजित पवारांची घोषणा
  • सभागृहात वीजबिलावरून विरोधकांचा गदारोळ

11:01 March 02

  • वाढलेल्या वीजबिलावरून चर्चा करण्याची विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांची मागणी

10:41 March 02

  • वीज दरवाढीवरून विधानसभेच्या पायऱ्यांवर भाजपतर्फे आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

10:38 March 02

  • पंकजा मुंडेंची मागणी रास्त आहे. त्यामुळे विकास आघाडीच्या एका मंत्र्याला न्याय वेगळा आणि दुसऱ्या मंत्र्याला न्याय वेगळा असे होऊ शकत नाही - प्रवीण दरेकर
  • संजय राठोड यांचा राजीनामा झाला, त्या वेळेला नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनीही राजीनामा द्यायला हवा होता - प्रवीण दरेकर

10:34 March 02

  • कुठल्याही वीज मेंटेनंन्सच्या कामावर अशाप्रकारचा सायबर अटॅक होत नसतो.  त्यामुळे सरकारने आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ नये - प्रवीण दरेकर

06:13 March 02

इंधन दरवाढी संदर्भात भूमिका स्पष्ट केली - प्रवीण दरेकर

मुंबई - पेट्रोलच्या दरवाढीच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे. राज्याचे विविध प्रकारचे कर असतात. ते कर वाढले, तर इंधनाचे दर वाढतात. तसेच गुजरात, कर्नाटक या राज्यात आपल्यापेक्षा पेट्रोल स्वस्त आहे. केंद्र या राज्यांना स्वस्त आणि आपल्याला महाग पेट्रोल देते, असे होत नाही, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. 

Last Updated : Mar 2, 2021, 9:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.