ETV Bharat / city

अनिल देशमुखांच्या याचिकेसंदर्भतील निकाल राखीव; तर सीबीआयला अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश - अनिल देशमुखांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. तसेच गेल्या दोन महिन्याचा तपास अहवाल सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने सीबीआयला दिले आहे.

anil deshmukh latest news
अनिल देशमुखांच्या याचिकेसंदर्भतील निकाल राखीव; तर सीबीआयला अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
author img

By

Published : Jul 12, 2021, 7:21 PM IST

मुंबई - सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी याचिका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालायात दाखल केली होती. त्यांच्या या याचिकेवर न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती निजाम उद्दीन जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. तसेच न्यायालयाने सीबीआयला दोन महिन्याचा तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

देशमुखांचे वकील काय म्हणाले -

भ्रष्टाचाराचे कारस्थान असल्याचा आरोप असेल तर सीबीआयने १५ दिवसांत केलेल्या प्राथमिक चौकशीत कारस्थानात सहभागी असलेल्या अन्य कोणाचेही नाव का सांगितले नाही, केवळ देशमुख यांचेच का उघड केले? कारण सीबीआयला प्राथमिक चौकशीत काही सापडलेच नाही. त्यामुळे देशमुख यांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे न्यायालयाचेच कर्तव्य आहे, असा युक्तिवाद देशमुखांच्या वकिलांनी न्यायालयात केला.

सीबीआयचे वकील काय म्हणाले -

भ्रष्टाचाराविषयी झालेले कट कारस्थान उजेडात आणण्यासाठी आरोपांविषयी पूर्ण तपास होणे आवश्यक आहे. गंभीर आरोपांमुळे लोकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम व अविश्वास दूर करण्याच्या उद्देशाने उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्राथमिक चौकशीचा आदेश दिला. आता गुन्हा रद्द करण्याची अनिल देशमुख यांची विनंती मान्य केल्यास लोकांच्या विश्वासालाच तडा जाईल, असे सीबीआयच्या वकिलांनी युक्तिवाद केला.

उद्या अहवाल सादर करा - न्यायालय

आज मुंबई उच्च न्यायालयात अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयने आपला तपास अहवाल न्यायालायत सादर केलेला नाही. त्यामुळे न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. तसेच 13 जुलैपर्यंत दोन महिन्याचा तपास अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.

न्यायालयाने दिल होते सीबीआय चौकशीचे आदेश -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित शंभर कोटी वसुलीचे आरोप केले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांचा तपास सध्या ईडीकडून ही सुरु आहे. याप्रकरणाचा तपास करत असताना ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरे तसेच कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. इतकेच नव्हे, तर ईडीने अनिल देशमुख यांच्या दोन्ही खासगी सचिवांची चौकशी करून त्यांना अटक केली आहे. याशिवाय परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी प्राथमिक चौकशी व आवश्यक असल्यास कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते. त्यानुसार सीबीआयने चौकशीअंती २१ एप्रिल रोजी देशमुख व अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने दाखल केलेला हा गुन्हा रद्द करावा, याकरिता अनिल देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.

हेही वाचा - सहकार खाते शाह यांच्याकडे गेल्याने घाबरण्याचे कारण नाही - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.