ETV Bharat / city

जेव्हा जेव्हा हिंदुत्व कमजोर होईल, तेव्हा देश गुलामगिरीमध्ये जाईल - देवेंद्र फडणवीस

राज्यात महविकास आघाडी सरकारला २ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत 'वीर सावरकर, द मॅन कुड ह्याव प्रिव्हेंटेड पार्टिशन' ( Veer Savarkar book publication ) या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील सावरकर स्मारकात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( book publication by devendra fadnavis ) यांच्या हस्ते करण्यात आले.

Veer Savarkar book publication by devendra fadnavis
सावरकर पुस्तक प्रकाशन देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Nov 30, 2021, 4:13 AM IST

मुंबई - राज्यात महविकास आघाडी सरकारला २ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत 'वीर सावरकर, द मॅन कुड ह्याव प्रिव्हेंटेड पार्टिशन' ( Veer Savarkar book publication ) या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील सावरकर स्मारकात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( book publication by devendra fadnavis ) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनाचा संदर्भ घेत फडणवीस यांनी ठाकरे सरकार, हिंदुत्व, २६/११ आतंकी हल्ला, मतांसाठी ममता बॅनर्जी यांची लाचारी यावर सडकून टीका करत मोदी सरकारची प्रशंसा केली.

Veer Savarkar book publication by devendra fadnavis
पुस्तकाचे छायचित्र

हेही वाचा - डोंबिवलीतील 'त्या' रुग्णाची मुंबईत होणार जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी, पुढच्या आठवड्यात येईल अहवाल

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करताना फडणवीस यांनी सावरकरांच्या विविध व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख केला. सावरकरांचे व्यक्तिमत्त्व बहुअंगी असून त्यांच्याबद्दल एका कार्यक्रमात बोलणे अशक्य आहे, असे सांगत सावरकर हे विद्यापीठ आहे. त्यांच्या विचारातून शिक्षित होता येते. कालपेक्षाही आज सावरकरांचे विचार आम्हाला मोलाचे वाटतात, असे फडणवीस म्हणाले.

भारताने जेव्हा जेव्हा बोटचेपी भूमिका घेतली तेव्हा तेव्हा आत्मविश्वास तर गमावला, भूभाग देखील गमावला. आजही आमच्या मोठ्या भूभागावर चीनचा कब्जा आहे.
पण, आज चीन आपल्याला घाबरत आहे. जर आम्ही हिंदी चिनी भाई भाई, असे धोरण ठेवले असते तर हे शक्य नसते. असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनविषयी स्वीकारलेल्या धोरणांची देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी स्तुती केली. त्याचप्रमाणे जी नीती सावरकरांना अपेक्षित होती तेच मोदी करत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

आतंकवाद्यांना मोदींकडून सडेतोड उत्तर

भारतीय सैन्याला पाठबळ कधीच मिळाले नाही. 10 आतंकवादी लोक आपल्याला ओलीस ठवेतात. तेव्हाचे काँग्रेस सरकार तीव्र शब्दांत निषेध करू, असे म्हणत राहिले. त्यांनी सडेतोड उत्तर कधीच दिले नाही. उलट मोदी सरकारच्या कार्यकाळात पाकिस्तानच्या सीमेवर घुसून हल्ला करून आमचे सैनिक परत आले. हे फक्त मोदींमुळेच होऊ शकते, असे सांगत फडणवीस यांनी २६/११ आतंकी हल्ल्यावरून काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी काँग्रेसला दिलेल्या घरच्या अहेरावर अप्रत्यक्ष टीका केली.

राज्यात भडकलेल्या दंगली एक प्रयोग

राज्यात निघालेले मोर्चे हा एक प्रयोग होता. त्रिपुरात कसा आतंकवाद चालला आहे, हे दाखवायचे आणि त्याबद्दल राहुल गांधी ट्विट करतात हे घातक आहे. राज्यात 50 हजारांचे मोर्चे काढायचे आणि हिंदूंची दुकाने जाळायची हा एक प्रयोग होता. आज अनेक काँग्रेस पक्ष तयार झाले आहेत. काही जण त्यांना जोडले गेले आहेत, अशी टीका शिवसेनेचे नाव न घेता फडणवीस यांनी केली.

ममतांवरही टीकास्त्र

आज ममता दिदींना निवडून येण्यासाठी बांगलादेशमधील मुस्लीम लोकांची गरज लागते आहे. जेव्हा जेव्हा हिंदुत्व कमजोर होईल, तेव्हा देश गुलामगिरीमध्ये जाईल, असे फडणवीस म्हणाले. देशापेक्षा मते मोठी आहेत, ही लाचारी संपली पाहिजे. मोदी आता ही लाचारी मोडून काढत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - Mamta Banarjee on Mumbai Visit : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या मुंबई दौऱ्यावर

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.