ETV Bharat / city

मुंबई मॅरेथॉन : वासुदेव आला हो.. वासुदेव आला.. ! - mumbai marathon

काही जण वेगवेगळ्या वेशभूषेत याठिकाणी येत असतात. त्याचप्रमाणे पनवेल येथे राहणाऱ्या संध्या कोरडे या वासुदेवच्या वेशभूषेत आल्या होत्या. वासुदेवाची माहिती सर्वांना झाली पाहिजे. यासाठी त्यांनी ही वेशभूषा परिधान केली होती.

संध्या कोरडे
संध्या कोरडे
author img

By

Published : Jan 19, 2020, 9:45 AM IST

Updated : Jan 19, 2020, 10:28 AM IST

मुंबई - शहरात आज 17 वी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. यामध्ये तब्बल ५५ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यावेळी राजकारण, समाजकारण, चित्रपटसृष्टी, क्रीडा यासह अन्य क्षेत्रातील दिग्गजांनी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थिती लावली होती. मात्र, या सर्वामध्ये एका मराठमोळ्या महिलेने केलेली वासुदेवाची वेशभूषा आकर्षण ठरत होती.

मुंबई मॅरेथॉन : वासुदेव आला हो.. वासुदेव आला.. !
मुंबई मॅरेथॉनमध्ये अनेक जण दरवर्षी सहभागी होतात. काही जण वेगवेगळ्या वेशभूषेत याठिकाणी येत असतात. त्याचप्रमाणे पनवेल येथे राहणाऱ्या संध्या कोरडे या वासुदेवच्या वेशभूषेत आल्या होत्या. वासुदेवाची माहिती सर्वांना झाली पाहिजे. यासाठी त्यांनी ही वेशभूषा परिधान केली होती. त्या पहाटेच स्पर्धेच्या ठिकाणी येऊन स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. वासुदेव ही महाराष्ट्राची संस्कृती आणि पंरपरा आहे. ती येणाऱ्या पिढीला माहिती असायला हवी म्हणून त्यांनी वासुदेवाची वेशभुषा केल्याची माहिती दिली.

कोरडे म्हणाल्या, आम्ही अनेक वर्षांपासून मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहोत. आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप दरवेळी काही ना काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी आम्ही 61 जण या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो होतो. अनेक जणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवायला हवा, असे मतही कोरडे यांनी यावेळी व्यक्त केले.

Intro:मुंबई

मुंबई मॅरेथॉनमध्ये अनेक जण दरवर्षी सहभागी होतात. काही जण वेगवेगळ्या वेशभूषेत याठिकाणी येत असतात. यावेळी पनवेल येथे राहणाऱ्या संध्या कोरडे या वासुदेवच्या वेशभूषेत आल्या होत्या. वासुदेवाची माहिती सर्वाना झाली पाहिजे यासाठी त्यांनी ही वेशभूषा परिधान केली होती. Body:आम्ही अनेक वर्षांपासून मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होतो. आमच्या जेष्ठ नागरिकांचा ग्रुप दरवेळी काही ना काही सामाजिक संदेश देत असतो. यावेळी आम्ही 61 जण या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो होतो. अनेक जणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असेही यावेळी कोरडे यांनी सांगितले.Conclusion:
Last Updated : Jan 19, 2020, 10:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.