चंद्रपूर - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांना अटक झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. अशातच मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राणा-राज प्रकरणात उडी घेतली आहे. ( MLA Ravi Rana arrested ) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे काँग्रेसच्या आरोग्य शिबिरातील भाषणात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता चौफेर टिका केली. राज ठाकरे यांचे नाव वडेट्टीवारांनी घेतले नाही. मात्र, त्यांनी "ज्यांचा चोंगा फाटलायं ते भोंग्यावर काय बोलू शकतात" असा टोला हानला. राणा दाम्पत्यावर बोलताना , राज्य-मुंबईची कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत दाम्पत्यासाठी चोट्टे-नीच-नालायक-हरामखोर अशा शब्दांचा वापर त्यांनी केला. राणा दाम्पत्याने हनुमान चालीसाचे महत्व आम्हाला सांगू नये, अशी बोचरी टीका त्यांनी केली. वडेट्टीवारांचा वक्तव्यामुळे राज्याचं आदीच तापलेलं राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
Vadettivara Ravi Rana : वडेट्टीवारांची जीभ घसरली; राणा दाम्पत्यावर जहरी टीका
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांना अटक झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. अशातच मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राणा-राज प्रकरणात उडी घेतली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे काँग्रेसच्या आरोग्य शिबिरातील भाषणात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता चौफेर टिका केली. राज ठाकरे यांचे नाव वडेट्टीवारांनी घेतले नाही. मात्र त्यांनी "ज्यांचा चोंगा फाटलायं ते भोंग्यावर काय बोलू शकतात" असा टोला हानला.