मुंबई - सुप्रिम कोर्टाच्या सल्ल्यानंतर लॉकडाऊन करण्याची वेळ केंद्रावर आली आहे. समजा आता केंद्राने देशात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतलाच तरी त्या निर्णयाला खूप उशीर झाला आहे, अशी टीका आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्यातील परिस्थिती पाहून लॉकडाऊनचा निर्णय
केंद्राने लॉकडाऊनचा निर्णय घेतला, तरी देखील राज्यात खरच लॉकडाऊन लावण्यासारखी स्थिती आहे का? याचा विचार करून लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेऊ, असेही यावेळी वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र दुसरीकडे अन्य राज्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून, लवकरच कोरोनाबाबत वेगळ्या गाईड लाईन तयार करू असं देखील यावेळी विजय वडेट्टीवर यांनी म्हटले आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी.
हेही वाचा - चंद्रकांत पाटील यांनी कोर्टाला खिशात ठेवले आहे का - मंत्री हसन मुश्रीफ