ETV Bharat / city

शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठीच राज ठाकरे यांना ईडीची नोटीस, विरोधी पक्षनेते वड्डेटीवार

author img

By

Published : Aug 21, 2019, 7:39 PM IST

Updated : Aug 21, 2019, 10:33 PM IST

शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठीच भाजपच्या इशाऱ्याने राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली असल्याचे मत विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यावरही दबाव निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

विरोधी पक्षनेते वड्डेटीवार

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने दिलेल्या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपला लक्ष्य करत आहेत. यात निवडणुकीचे राजकारण असल्याचे मत विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी म्हटले आहे. शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठीच भाजपच्या इशाऱ्याने राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली असल्याचे मत, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी व्यक्त केले आहे.

विरोधी पक्षनेते वड्डेटीवार

एकीकडे भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, अद्याप दोन्ही पक्षांचे जागा वाटप झाले नाही. भाजपच्या सर्वाधिक जागा असताना शिवसेनेनेही समप्रमाणात जागांची मागणी केली असल्याने आगामी विधानसभेच्या वाटाघाटीत दबाव निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवरच ठाकरे यांना ईडीची नोटीस देऊन उद्धव ठाकरे यांच्यावरही दबाव निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात विरोधकांना एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. या प्रयत्नाला खीळ बसावी हाही या नोटीशीमागील उद्देश असल्याचे विरोधी पक्षनेते वड्डेटीवार यांनी म्हटले आहे.

Intro:सूचना- या बातमीसाठी विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांचा byte ३G LIVE U वरून पाठवले आहे . ​

शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठीच राज ठाकरे यांना ईडीची नोटीस, विरोधी पक्ष नेत्यांचे मत

मुंबई २१

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने दिलेल्या नोटिशीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष एकीकडे भाजपाला लक्षक करत असतानाच , यात निवडणुकीचे राजकारण असल्याचे मत विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी म्हटले आहे . शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठीच भाजपच्या इशाऱ्याने राज ठाकरे यांना ईडीची नोटीस बजावली असल्याचे मत विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी व्यक्त केले आहे .

एकीकडे भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप दोन्ही पक्षांचे जागा वाटप झाले नाही . भाजपच्या सर्वाधिक जागा असल्यातरी शिवसेने ने समप्रमाणात जागांची मागणी केली असल्याने आगामी विधानसभेच्या वाटाघाटीत दबाव निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे . यापार्श्वभूमीवरच ठाकरे यांना ईडी ची नोटीस देऊन उद्धव ठाकरे यांच्यावरही दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपचा असल्याचे त्यांनी सांगितले .

तसेच राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात विरोधकांना एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न चालवला आहे . या प्रयत्नाला खीळ बसावी हाही या नोटिसी मागचा उद्देश असल्याचे विरोधीपक्ष नेते वड्डेटीवार यांनी म्हटले आहे . Body:....Conclusion:null
Last Updated : Aug 21, 2019, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.