ETV Bharat / city

मुंबईत आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात - Vaccination Latest Update

राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मुंबईत आजपासून लसीकरण केले जात आहेत. ५० टक्के नोंदणी तसेच ५० टक्के वॉकइन पद्धतीने येणाऱ्यांचे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. कोविशिल्ड या लसीपेक्षा कोव्हॅक्सिन लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमी आहे.

मुंबईत आजपासून लसीकरणाला सुरूवात
मुंबईत आजपासून लसीकरणाला सुरूवात
author img

By

Published : Jun 21, 2021, 9:23 AM IST

मुंबई - मुंबईत आजपासून राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यासाठी महापालिकेची लसीकरण केंद्र सज्ज झाली आहेत. ५० टक्के नोंदणी तसेच ५० टक्के वॉकइन पद्धतीने येणाऱ्यांचे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे महापालिका, सरकारी रुग्णालयात हे लसीकरण मोफत केले जाणार आहे.

३० ते ४४ वयोगटातील लसीकरण

योग दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली आहे. मात्र महाराष्ट्र राज्यात लसीचा तुटवडा असल्याने तसेच लसीचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्येही लसीचा नेहमीच तुटवडा जाणवत होता. अनेकवेळा लसीकरण बंद ठेवावे लागले आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेकडून आजपासून (सोमवार) ४५ वर्षावरील नागरिकांसह, ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण केले जात आहे.

३० ते ४४ वयोगटासाठी हे नियम

३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लस बहुतेक केंद्रांवर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत दिली जाणार आहे. या वयोगटातील नागरिकांना पहिला डोस दिला जाईल. तसेच ५० टक्के ऑनलाईन नोंदणी व ५० टक्के थेट नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे.

४५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना हे नियम

४५ वर्षाहून अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी पहिला डोस ५० टक्के, तर दुसरा डोस ५० टक्के या प्रमाणात आजपासून लसीकरण केले जाणार आहे. आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस ५० टक्के ऑनलाईन नोंदणी व ५० टक्के थेट नोंदणी द्वारे दिला जाणार आहे. यासाठी त्यांना पहिल्या डोसचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.

परदेशी जाणाऱ्यांसाठी नियम

शैक्षणिक कारण, नोकरी, व टोकियो ऑलम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी परदेशी जाणाऱ्या नागरिकांकरिता वॉकइन पद्धतीने लसीकरण केले जाईल. तसेच त्यांना पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेता येईल. त्यासाठी त्यांना योग्य प्रमाणपत्र अनिवार्य असतील.

कोव्हॅक्सिन लस घेणाऱ्यांची संख्या कमी

कोविशिल्ड या लसीपेक्षा कोव्हॅक्सिन लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या खुपच कमी आहे. कोव्हॅक्सिन लसीचा केवळ दुसरा डोस उपलब्ध आहे. त्यासाठी पहिल्या डोसचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस केंद्रांवर जाऊन थेट घेता येणार आहे.

हेही वाचा - लसीकरणाबाबत केंद्राकडून योग्य नियोजन झाले नाही - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.