मुंबई - मुंबईत मागील मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज मुंबईत 38 हजार 369 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 7 लाख 28 हजार 613 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत आज 38 हजार 369 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 32 हजार 882 लाभार्थ्यांना पहिला तर 5 हजार 478 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 7 लाख 28 हजार 613 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 6 लाख 36 हजार 321 लाभार्थ्यांना पहिला तर 92 हजार 292 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 6 हजार 582 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 48 हजार 468 फ्रंटलाईन वर्कर, 3 लाख 28 हजार 168 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 45 हजार 395 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरण -
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज 23 हजार 086 तर आतापर्यंत 5 लाख 38 हजार 806 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 2 हजार 169 लाभार्थ्यांना तर एकूण 26 हजार 502 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 13 हजार 114 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत कूण 1 लाख 63 हजार 305 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी - 2,06,582
फ्रंटलाईन वर्कर - 1,48,468
जेष्ठ नागरिक - 3,28,168
45 ते 59 वय - 45,395
एकूण - 7,28,613