ETV Bharat / city

मुंबईत गुरुवारी 22 हजार 975 जणांचे लसीकरण

author img

By

Published : Mar 5, 2021, 12:18 AM IST

1 मार्चपासून 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आज मुंबईत 22 हजार 975 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 2 लाख 83 हजार 288 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

मुंबईत गुरुवारी 22 हजार 975 जणांचे लसीकरण
मुंबईत गुरुवारी 22 हजार 975 जणांचे लसीकरण

मुंबई - मुंबईत मागील मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आज मुंबईत 22 हजार 975 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 2 लाख 83 हजार 288 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

लसीकरणाची आकडेवारी

मुंबईत गुरुवारी 43 लसीकरण केंद्रांवरील 177 बूथवर एकूण 22 हजार 975 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 19 हजार 574 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 401 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 83 हजार 288 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात 2 लाख 49 हजार 620 लाभार्थ्यांना पहिला तर 33 हजार 668 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 1 लाख 44 हजार 029 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 3 हजार 313 फ्रंटलाईन वर्कर, 32 हजार 818 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षांमधील गंभीर आजार असलेल्या 3 हजार 128 लाभार्थ्यांना लस देण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

महापालिकेतील लसीकरण

मुंबई महापालिकेच्या 22 लसीकरण केंद्रावरील 142 बुथवर गुरुवारी 15 हजार 221 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 996 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 18 हजार 217 लाभार्थ्यांना लसीचा डोस देण्यात आला. आतापर्यंत पालिकेच्या लसीकरण केंद्रात 2 लाख 34 हजार 508 लाभार्थ्यांना पहिला तर 31 हजार 340 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 2 लाख 65 हजार 848 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे.

सरकारी रुग्णालयातील लसीकरण

केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील 2 लसीकरण केंद्रांवरील 4 बुथवर आज 499 लाभार्थ्यांना पहिला तर 131 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 630 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत सरकारी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 6 हजार 665 लाभार्थ्यांना पहिला तर 630 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 7 हजार 295 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

खासगी रुग्णालयातील लसीकरण

खासगी रुग्णालयातील 19 लसीकरण केंद्रावरील 31 बुथवर आज 3 हजार 854 लाभार्थ्यांना पहिला तर 274 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 4 हजार 128 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 8 हजार 447 लाभार्थ्यांना पहिला तर 1 हजार 698 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 10 हजार 145 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

या केंद्रावर उद्यापासून लसीकरण

उद्या शुक्रवार पासून मुंबई महापालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालय, खासगी रुग्णालय असलेल्या ब्रीच कॅंडी, एच एन रिलायंस, मसीना त्याचप्रमाणे पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ देणाऱ्या सायन येथील लायन ताराचंद, घाटकोपर येथील सपना हॉस्पिटल, जोगेश्वरी येथील मिल्लत डायग्नोस्टिक, मालाड येथील बालाजी हॉस्पिटल, भांडुप येथील मिनाज तसेच डॉ. भाटिया रुग्णालय येथे लसीकरण करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आतापर्यंतचे लसीकरण

आरोग्य कर्मचारी - 1,44,029
फ्रंटलाईन वर्कर - 1,03,313
जेष्ठ नागरिक - 32,818
45 ते 59 वर्षांमधील गंभीर आजार असलेले व्यक्ती - 3128

एकूण - 2,83,288

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.