मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. आज शुक्रवारी 22 हजार 686 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 29 लाख 29 हजार 757 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत शुक्रवारी 22 हजार 686 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 19 हजार 863 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 823 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 29 लाख 29 हजार 757 लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 21 लाख 99 हजार 204 लाभार्थ्यांना पहिला तर 7 लाख 30 हजार 553 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 99 हजार 538 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 57 हजार 560 फ्रंटलाईन वर्कर, 11 लाख 68 हजार 789 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार व इतर 10 लाख 30 हजार 951 तर 18 ते 44 वर्षामधील 72 हजार 919 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरण मोहीम -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. आज 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. सोमवार ते बुधवार जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग यांचे लसीकरण केले जाणार आहे. तर गुरुवार ते शनिवार पर्यंत कोविन ऍपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल तरच लसीकरणाला या असे आवाहन पालिकेने केले आहे. लसीच्या तुटवड्यामुळे शनिवार 15 मे आणि रविवार 16 मे असे दोन दिवस लसीकरण बंद होते. तर सोमवारी 17 मे ला तौक्ते चक्रीवादळामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.
एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 2,99,538
फ्रंटलाईन वर्कर - 3,57,560
जेष्ठ नागरिक - 11,68,789
45 ते 59 वय - 10,30,951
18 तर 44 वय - 72,919
एकूण - 29,29,757