मुंबई - मुंबईत मागील मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आज मुंबईत 13 हजार 800 लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा जास्त 135 टक्के म्हणजेच 18 हजार 566 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 2 लाख 60 हजार 313 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. विशेष म्हणजे कोविन ऍपमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्या तरी मुंबईत उद्दिष्टापेक्षा जास्त लसीकरण करण्यात आले आहे.
लसीकरणाची आजची आकडेवारी
मुंबईत आज 27 लसीकरण केंद्रांच्या 138 बूथवर एकूण 13 हजार 800 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा अधिक 135 टक्के लसीकरण झाले आहे. आज 18 हजार 566 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 14 हजार 839 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 737 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आज एकूण 5 हजार 64 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, त्यात 1337 कर्मचाऱ्यांना पहिला तर 3727 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. 2 हजार 483 फ्रंटलाईन वर्कर, 45 ते 59 वर्षांमधील विविध आजार असलेल्या 1078 तर 60 वर्षांवरील 9941 लाभार्थ्यांना आज लस देण्यात आली देण्यात आली आहे. दरम्यान या लसीकरणाचा 5 जणांवर सौम्य दुष्परिणाम झाला आहे. आतापर्यंत 2 लाख 30 हजार 46 लाभार्थ्यांना पहिला तर 30 हजार 267 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 2 लाख 60 हजार 313 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी - 1,38,833
फ्रंटलाईन वर्कर - 1,01,626
45 वर्षावरील आजारी - 1928
60 वर्षावरील - 17,926
एकूण - 2,60,313