ETV Bharat / city

Vaccination in State : राज्याने लसीकरणाचा 11 कोटींचा टप्पा ओलांडला, 3 कोटी 87 लाख नागरिकांना दोन्ही डोस

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्रात (Maharashtra) 16 जानेवारीपासून लसीकरण (Vaccination) सुरू आहे. दहा महिन्यात 11 कोटी 20 लाख 17 हजार 541 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. 7 कोटी 32 लाख 57 हजार 581 लाभार्थ्यांना पहिला तर 3 कोटी 87 लाख 59 हजार 230 लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी मुंबईत 1 कोटी 57 लाख 33 हजार 818 लसीचे डोस देण्यात आले आहेत. मुंबईने 1 कोटी 50 लाख लसीचा टप्पा ओलांडला आहे.

vaccination
लसीकरण
author img

By

Published : Nov 29, 2021, 8:59 PM IST

मुंबई : पावणे दोन वर्षाच्या कालावधीत राज्यात कोरोनाच्या (Corona Waves) दोन लाटा आल्या, या दोन्ही लाटा थोपवण्यात राज्य सरकार तसेच मुंबई महापालिकेला (BMC) यश आले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम (Vaccination Campaign) सुरू आहे. या कालावधीत राज्यात 11 कोटी 20 लाख 17 हजार 541 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

  • 30 तारखेपर्यंत सर्वांना पहिला डोस देण्याचे उद्दीष्ट

आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या लसीचे 12 लाख 94 हजार 272 तर 11 लाख 42 हजार 296 लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. फ्रंटलाईन वर्करना पहिल्या लसीचे 21 लाख 47 हजार 739 तर 18 लाख 99 हजार 550 दोन्ही डोस देण्यात आले आहेत. 18 ते 44 वयातील 4 कोटी 8 लाख 51 हजार 393 लाभार्थ्यांना लसीचा पहिला तर 1 कोटी 75 लाख 26 हजार 632 लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. 45 वर्षावरील 2 कोटी 89 लाख 64 हजार 619 लाभार्थ्यांना लसीचा पहिला तर 1 कोटी 81 लाख 91 हजार 40 लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दीष्ट सरकारसमोर आहे.

  • मुंबईचे टार्गेट पूर्ण -

मुंबईत 1 कोटी 57 लाख 33 हजार 818 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी 92 लाख 91 हजार 692 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 64 लाख 42 हजार 126 लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. मुंबईने 1 कोटी 50 लाख लसीचा टप्पा ओलांडला आहे. तसेच सरकारने एकूण लोकसंख्येपैकी 92 लाख 35 नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेला दिले होते. 92 लाख 35 नागरिकांना लसीचा पहिला डोस देऊन पालिकेने हे उद्दिष्ट (Target) पूर्ण केले आहे.

  • असे झाले लसीकरण -

मुंबईत 1 कोटी 57 लाख 33 हजार 818 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना 7 लाख 56 हजार 539, 60 वर्षावरील वयोवृद्ध 21 लाख 45 हजार 963, 45 ते 59 वायमधील 37 लाख 91 हजार 494, 18 ते 44 वायमधील 89 लाख 61 हजार 173, स्तनदा माता 14 हजार 842, गर्भवती महिला 3 हजार 492, परदेशी शिक्षण घेणारे विद्यार्थी कामाला जाणारे 33 हजार 427, मानसिक रुग्ण 8032, ओळखपत्र नसलेले 9729, बेडवर असलेल्या 9127 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

हेही वाचा - लसीचे दोन डोस घेतले नसल्यास बेस्टमध्ये नो एंट्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.