ETV Bharat / city

'सुपर स्प्रेडर म्हणणाऱ्या भाजपला विधानसभा निवडणुकीत अद्दल घडवा' - उमाकांत अग्निहोत्री - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

काँग्रेसला मतदान करून भाजपाला धडा शिकवा, अशा आशयाची एक लाख पत्रे मुंबईतील उत्तर भारतीय बांधव त्यांच्या नातेवाईकांना पाठणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उत्तर प्रदेश सेलचे (Maharashtra Congress UP cell) अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री यांनी दिली.

Maharashtra Congress UP cell
Maharashtra Congress UP cell
author img

By

Published : Feb 10, 2022, 10:51 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत (PM Modi Parliament Speech) बोलताना उत्तर भारतीयांना कोरोना पसरवणारे सुपर स्प्रेडर म्हणून अपमान केला आहे. उत्तर भारतातल्या वाराणसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून दिले. त्यांचाच मोदींनी घोर अपमान केला. मोदींनी केलेल्या अपमानाची सल उत्तर भारतीयांच्या मनात आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान करून भाजपाला धडा शिकवा, अशा आशयाची एक लाख पत्रे मुंबईतील उत्तर भारतीय बांधव त्यांच्या नातेवाईकांना पाठणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उत्तर प्रदेश सेलचे (Maharashtra Congress UP cell) अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री यांनी दिली.

congress up cell
काँग्रेसच्या उत्तर प्रदेश सेलचे पत्र
मुंबईत तसेच उपनगरात लाखो उत्तरं भारतीय रहातात. या महाराष्ट्रात उत्तरभारतीय बांधवांना रोजगार, सुरक्षा पुरवली आहे. कोरोना काळातही उत्तर भारतीयांना जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्य देण्याची व्यवस्था झाली. सामान्य लोकांनी मदत केली. कोरोना काळात आपल्या गावी निघालेल्या उत्तर भारतीयांना अनेकांनी मदत केली. महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेस पक्षाने देखील सर्व मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर भारतीयांनाच सुपर स्प्रेडर ठरवलं. हा उत्तर भारतीयांचा घोर अपमान आहे. आता नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, भारतीय जनता पक्ष यांच्या भुलथापांना उत्तर भारतीयांनी बळी पडू नये. मंदिर- मशिद, हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करणारे भाजपा व समाजवादी पक्ष या दोघांनाही या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या. प्रियंका गांधी यांच्या ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’, अभियानाला साथ द्या, काँग्रेसला मतदान करा आणि काँग्रेसलाच सत्तेत आणा, असे आवाहन अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. हेही वाचा - Vijay Wadettiwar On PM : मोदी म्हणतात भाजपची लाट, युपीत खरी असंतोषाची, बेरोजगारीची लाट - वडेट्टीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.