मुंबई - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीनुकतंच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.उर्मिला यांच्या काँग्रेस प्रवेशापासूनच त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू होत्या आता उर्मिलाला उत्तर मुंबईतून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या गोपाळ शेट्टीविरोधात उर्मिला निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे.
उत्तर मुंबईतउर्मिला यांचे भरपूर चाहते असल्याने याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. याआधी अभिनेता गोविंदा यांनीही उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती आणि ते निवडूनही आले होते. उत्तर मुंबईतील चाहत्यांचे कलाकारांबद्दलचे हे क्रेझ पाहता गोपाळ शेट्टी आणि उर्मिला यांच्यात चांगलीच टक्कर असणार आहे. अभिनय क्षेत्रात आपली छाप उमटवलेल्या उर्मिला मातोंडकर आता राजकाराणातही आपली छाप उमटवण्यात यशस्वी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Urmila Matondkar to contest from Mumbai North parliamentary constituency on a Congress ticket. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/LrzBiAa5QF
— ANI (@ANI) March 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Urmila Matondkar to contest from Mumbai North parliamentary constituency on a Congress ticket. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/LrzBiAa5QF
— ANI (@ANI) March 29, 2019Urmila Matondkar to contest from Mumbai North parliamentary constituency on a Congress ticket. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/LrzBiAa5QF
— ANI (@ANI) March 29, 2019
या मतदार संघात २०१४ च्या मोदी लाटेनंतर भाजपाचे प्राबल्य असून त्या ठिकाणी काँग्रेसकडे प्रभावी उमेदवार नव्हता. उमेदवारांच्या शोधात असताना ४ दिवसांपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचे निश्चितझाले होते. त्यासाठी काँग्रेसचे माजी प्रदेधाध्यक्ष संजय निरुपम यांच्या पुढाकाराने मातोंडकर यांची काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घडवून आणण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसने मातोंडकर यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी मातोंडकर यांना थेट सामना करावा लागणार आहे. या मतदार संघात येणाऱ्या सहा विधानसभा क्षेत्रात भाजपचे ४ आणि प्रत्येकी १ काँग्रेस व शिवसेना यांचे आमदार आहेत. यातदहीसर, मागाठाणे, कांदिवली,चारकोप, मालाड आणि बोरिवली या विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. मालाड विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे वर्चस्व आहे, तर उर्वरित विधानसभा मतदार संघात भाजप-सेना यांचे. २००९ मध्ये याच मतदार संघातून संजय निरुपम हे लोकसभेवर निवडून आले होते. तर २०१४ मध्ये मोदी लाटेत शेट्टी यांनी हा मतदार संघ आपल्याकडे खेचून घेतला होता.