मुंबई - अभिनेत्री कंगणा रनौतने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. राऊत यांनी कंगणाला मुंबई सोडण्यास प्रवृत्त केल्याचे तिने ट्विट केले. यानंतर सिनेतारकांमध्ये ट्विटर वॉर सुरू झालंय. यावर राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली असून आता विविध सिनेतारकांनीही उडी मारली आहे. कंगणाच्या या ट्विटनंतर आता #मुंबई_मेरी_जान नावाचा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.
-
Maharashtra is cultural n intellectual face of India..land of Great Shivaji maharaj. Mumbai has fed millions of Indians n given them Name Fame n Glory.Only ungrateful can compare it with POK..Shocked n disgusted #EnoughIsEnough #आमचीमुंबई #mumbaimerijaan #जयमहाराष्ट्र ❤️
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) September 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra is cultural n intellectual face of India..land of Great Shivaji maharaj. Mumbai has fed millions of Indians n given them Name Fame n Glory.Only ungrateful can compare it with POK..Shocked n disgusted #EnoughIsEnough #आमचीमुंबई #mumbaimerijaan #जयमहाराष्ट्र ❤️
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) September 3, 2020Maharashtra is cultural n intellectual face of India..land of Great Shivaji maharaj. Mumbai has fed millions of Indians n given them Name Fame n Glory.Only ungrateful can compare it with POK..Shocked n disgusted #EnoughIsEnough #आमचीमुंबई #mumbaimerijaan #जयमहाराष्ट्र ❤️
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) September 3, 2020
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी तर कंगणाला चांगलंच खडसावलं आहे. महाराष्ट्र हा संपूर्ण देशाचा सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा असून ही छत्रपती शिवाजी महाराजांंची पुण्यभूमी असल्याचे ट्वीट उर्मिलाने केलं आहे. हे सर्व शॉकिंग असल्याचं तिने म्हटलंय.
मुंबईने कोट्यवधी भारतीयांना स्वत:ची ओळख दिली आहे. केवळ कृतघ्न लोक याची तुलना पीओकेशी करू शकतात, असे उर्मिलाने म्हटले.
कंगणा रनौतने सेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कमेंट केली. तसेच मुंबईची तुलना पाकिस्तानशी केल्याने ट्विटरवर युद्ध सुरू झाले आहे. यामध्ये मनसे, शिवसेनेसह अनेक सेलिब्रिटींनीही उडी घेतली आहे.