ETV Bharat / city

यूपीएससी टॉपर प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या यशात वडिलांची प्रेरणा महत्वाची

मुंबईच्या प्रियंवदा यांनी दुसऱ्याच प्रयत्नात युपीएससी (UPSCupsc Result 2021) परीक्षेत यश मिळवले. त्या राज्यात पहिल्या आल्यात. सध्या त्या हैदराबादमध्ये असतात. देशात त्यांचा १३ वा क्रमांक आला आहे. अभियांत्रिकीची पदवी, एमबीए, जर्मन भाषेचे शिक्षण, जर्मन बँकेत ६ वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी भारतात आयएएस परीक्षेत अवघवीत यश प्राप्त केलं आहे.

यूपीएससी टॉपर प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या यशात वडिलांची प्रेरणा महत्वाची
यूपीएससी टॉपर प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या यशात वडिलांची प्रेरणा महत्वाची
author img

By

Published : Jun 1, 2022, 6:42 AM IST

Updated : Jun 2, 2022, 1:47 PM IST

मुंबई - प्रियंवदा म्हाडदळकर या इंजिनिअर आहेत. त्यानंतर त्यांनी बेंगलोरमधून एमबीएचे शिक्षण घेतले. जर्मन बँकेत उच्चपदस्त नोकरीवर त्या होत्या. मात्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतात परत येऊन त्यांनी यूपीएससीचा अभ्यास केला आणि स्वप्न साकार केले. मुंबईच्या प्रियंवदा यांनी दुसऱ्याच प्रयत्नात युपीएससी (UPSCupsc Result 2021) परीक्षेत यश मिळवले. त्या राज्यात पहिल्या आल्यात. सध्या त्या हैदराबादमध्ये असतात. देशात त्यांचा १३ वा क्रमांक आला आहे. अभियांत्रिकीची पदवी, एमबीए, जर्मन भाषेचे शिक्षण, जर्मन बँकेत ६ वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी भारतात आयएएस परीक्षेत अवघवीत यश प्राप्त केलं आहे.

प्रियंवदा यांचे (UPSC Topper Priyamvada Mhaddalkar) बालपण मुंबईत गेले. मुंबईतील डी.जी.रुपारेल महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. व्हीजेटीआयमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची पदवी घेतली. आयआयएम बेंगलोर येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणाच्या जोरावर जर्मनीत डॉएश्च बँकेत ६ वर्षे नोकरी केली. या बँकेत असिस्टंट व्हाईस प्रेसिंडेंट या पदावर कार्यरत त्या कार्यरत होत्या. सर्व काही सुरळीत सुरु असताना भारतात परतावे असे वाटले. येथे येऊन युपीएसच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला. दुसऱ्याच प्रयत्नात आयएएस झाल्या.

परीक्षेची तयारी - प्रियंवदा यांचे वडील सरकारी सेवेत कार्यरत होते. वडिलांकडूनच सरकारी सेवेत रुजू होण्याची प्रेरणा मिळाली, असे त्या सांगतात. भारतात येऊन युपीएससीची तयारी सुरु केली. नियोजनबद्ध अभ्यास, सराव आणि वैकल्पिक विषयांवर भर दिला. अभ्यास करताना वैकल्पिक विषयाचा आवाका मोठा असल्याने त्यावर खूप भर दिला, भरपूर सराव आणि अभ्यासातला नियमितपणा हे यशाचे गमक असल्याचे त्यानी सांगितले आहे.

हैदराबादमधील आयपीएस अधिकारी महेश भागवत यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे मोठे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुख्य परीक्षेत एखाद्या गोष्टीवर बोलायचे असते किंवा लिहायचे असते. मात्र मुलाखतीत या उत्तरांचा रोख बदललेला असतो. तिथे अगदी मुद्देसूद बोलावे लागते. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून अभ्यास केला. या यशात त्यांच्या घरच्यांचा, नवर्‍याचा आणि सासरच्यांचा खूप मोठा वाटा असल्याचेही त्या सांगतात. वडील हे आदर्श होते. त्यांच्यासारखे व्हायचे होते, यामुळे लहानपणापासून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते, चांगली नोकरी मिळाल्यानंतर लहानपणाचे स्वप्न विसरल्याची जाणीव झाली. यामुळे नोकरी सोडून लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरविले आणि यश मिळाले, असेही त्यांनी सांगितले आहे.

Last Updated : Jun 2, 2022, 1:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.