ETV Bharat / city

धक्कादायक..! युपीएससीचे विद्यार्थी दोन ठिकाणांवरून उचलतात शिष्यवृत्ती

सारथी आणि महाज्योती या दोन्ही संस्थेच्या शिष्यवृत्ती योजनेमध्ये एकाच जाती प्रवर्गातील विद्यार्थी लाभ घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे, सारथी आणि महाज्योतीच्या कार्यपद्धतीवर विद्यार्थ्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

author img

By

Published : Jun 13, 2021, 5:33 PM IST

scholarships pick up two places upsc
युपीएससी शिष्यवृत्ती घोळ

मुंबई - देशातील सर्वात महत्वाच्या आणि आव्हान मानल्या जाणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेमध्ये राज्यातील उमेदवारांचे प्रमाण वाढविण्यासाठी गुणवत्ताधारित विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. तसेच यूपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विविध जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्यातील चार संस्थांकडून शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र सारथी आणि महाज्योती या दोन्ही संस्थेच्या शिष्यवृत्ती योजनेमध्ये एकाच जाती प्रवर्गातील विद्यार्थी लाभ घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे, सारथी आणि महाज्योतीच्या कार्यपद्धतीवर विद्यार्थ्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हेही वाचा - मुंबई : गुंगीचे औषध देऊन महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार; गुन्हा दाखल

काय आहे शिष्यवृत्ती योजना ?

यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पैशाची खरी खूप गरज असते. मात्र, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यी पैशांअभावी आणि सुविधांअभावी परीक्षेपासून दूर जात होते. त्यामुळे, भारतीय प्रशासकीय सेवेत राज्यातील उमेदवारांचे प्रमाण वाढविण्यासाठी गुणवत्ताधारित विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून आर्थिक मदत योजना सुरू केली आहे. ही मदत राज्यातील बार्टी, तारर्ती, सारथी, महाज्योती अशा चार संस्थाकडून केली जाते. संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीसाठी शिष्यवृत्ती योजना सारथी आणि महाज्योती या संस्थांमार्फत राबविली असून, पात्र उमेदवारांना २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. याकरिता संस्थेकडून पात्र ठरलेल्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे वेळोवेळी आवाहन करीत असते.

काय आहे प्रकरण ?

नुकतेच संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल 23 मे 2021 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे ही संस्था यूपीएससीची वर्ष २०२० कालावधीतील मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या लक्षित गटातील २१ उमेदवारांना आणि प्रायोजित नसलेल्या लक्षित गटातील ३२ अशा एकूण ५३ उमेदवारांना मुलाखतीसाठी २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. तर, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशक्षिण संस्थेकडून (महाज्योती) एकूण ६४ उमेदवारांना २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. मात्र, या दोन्ही संस्थेच्या शिष्यवृत्ती लाभार्थी यादीमध्ये १० विद्यार्थ्यांची नावे सारखी दिसून येतात. हे १० ही विद्यार्थी एकाच जाती प्रवर्गात मोडत असल्याने विद्यार्थी वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मंत्र्यांनी लक्ष घालावेत

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशक्षिण संस्थेकडून (महाज्योती) योग्यरीतीने तपासणी न करता एकाच योजनेसाठी दोनदा अर्थसहाय्य केले जात आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे ही संस्थाने आर्थिक साहाय्य घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मदत देत आहे. एक जाती प्रवर्गात विद्यार्थीला सारथी आणि महाज्योती अशा दोन्ही संस्थेचा लाभ कायम असल्यामुळे हा घोळ होत आहे. कोणतीही जात अथवा समूह एका योजनेसाठी एकदाच पात्र असते. परंतु, एक विशिष्ट जातीला दोन्ही ठिकाणी अबाधित ठेवल्याने हा प्रकार घडत आहे. बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार आणि वित्तीय नियोजन मंत्री अजित पवार यांनी यात लक्ष घालून हा प्रकार दुरुस्त करावा, तोपर्यंत नवीन जाहिरात काढू नये, या घोळात विद्यार्थ्यांचा दोष नसून महाज्योती आणि सारथी यांचा दोष आहे. त्यामुळे, हा बिघाड दूर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष उमेश कोर्राम यांनी केली.

वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थांना त्रास -

संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता मुलाखतीची तयार करत आहे. त्यात हा घोळ झाल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम पडणार आहे. विशेष म्हणजे, महाज्योतीमध्ये इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती-जमाती, तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांचा, तर सारथीमध्ये मराठा, मराठा-कुणबी, कुणबी या समुदायाचा समावेश होतो. मात्र, यातील काही जाती प्रवर्ग समान आहे. तरी येथील विद्यार्थ्यांना कुठल्याही एका शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचा नियम आहे. मात्र, या ठिकाणी वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे हा घोळ होत आहे. त्यामुळे, यांच्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.

हेही वाचा - मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यावर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.