ETV Bharat / city

यूपीएससीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर , यंदाच्या वर्षातील मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे

author img

By

Published : Jun 5, 2020, 9:20 PM IST

सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा जी आधी 31 मे रोजी नियोजित होती, ती लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आली होती. नव्या वेळापत्रकानुसार सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबर 2020 रोजी तर मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021रोजी होणार आहे.

Union Public Service Commission
संघ लोकसेवा आयोग

मुंबई- कोरोना संसर्गामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021मध्ये होणार असल्याचे आयोगाकडून जाहीर आज करण्यात आले आहे.

आयोगाने देशातील कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिल्लीत बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर यूपीएससी परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. कोरोना संकटामुळे स्थगित झालेल्या यूपीएससीच्या विविध परीक्षांसाठीचे नवे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले आहे. 2020 वर्षात होणाऱ्या परिक्षांसाठी हे नवे वेळापत्रक यूपीएससीच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे.

सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा जी आधी 31 मे रोजी नियोजित होती, ती लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आली होती. नव्या वेळापत्रकानुसार सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबर 2020 रोजी तर मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021रोजी होणार आहे. शिवाय 2019 च्या परीक्षेमध्ये मुलाखतीचा टप्पा कोरोनामुळे अपूर्ण राहिला होता. ज्या उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या, त्या 20 जुलै 2020 पासून सुरू होणार आहेत. त्याबाबत उमेदवारांना वैयक्तिक पत्राद्वारे तारीख कळवली जाईल.

एनडीएची परीक्षा 6 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे. केंद्रीय सुरक्षा पोलीस दलाच्या परीक्षेसाठी 18 ऑगस्ट 2020 पासून नोंदणी सुरू होणार असून 20 डिसेंबर 202 रोजी परीक्षा होईल. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची परीक्षा 28 फेब्रुवारी 2021 रोजी परीक्षा होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यूपीएससीच्या वर्षभराच्या परीक्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर होत असते. यावेळी कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. पण आज आयोगाने हे बदल केलेले नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.

अर्थात परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली तर या परीक्षांच्या तारखेत थोडाफार बदल होऊ शकतो, असेही आयोगाने आज म्हटले आहे. महाराष्ट्रात एमपीएससीच्या काही परीक्षांच्या निकालाबद्दल, तारखेबद्दल अजून संभ्रम आहे. त्यामुळे आता यूपीएससीने विद्यार्थ्यांचा गोंधळ कमी केल्यानंतर एमपीएसीकडूनही वेळीच निकाल आणि नव्या तारखाया जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.