ETV Bharat / city

यु.पी.एस. मदान यांनी वित्त विभागाच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला

अर्थ विभागाचे प्रधान सचिव युपीएस मदान यांनी विविध विभागात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. ते १९८३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी आतपर्यंत विविध विभागात काम केले आहे.

author img

By

Published : Mar 27, 2019, 3:21 PM IST

युपीएस मदान, अर्थ विभागाचे प्रधान सचिव

मुंबई - निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर राज्याचे वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव युपीएस मदान यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आज सकाळी अकराच्या सुमारास पदभार स्विकारून कामकाजास सुरुवात केली. तत्कालिन मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांची लोकपाल मंडळात सदस्यपदी नियुक्ती झाल्याने मंगळवारी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. दरम्यान, वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदाचा अतिरीक्त कार्यभार मदान यांच्याकडे देण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मदान यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

कोण आहेत युपीएस मदान?
मदान हे मूळचे पंजाब राज्यातील चंदीगढ येथील आहेत. त्यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९५९ मध्ये झाला. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मदान यांचे वडील बँकेत नोकरीला होते. वाणिज्य आणि विधी शाखेचे पदवीधर असलेल्या मदान यांनी युनाटेड किंगडम येथे विकास व प्रकल्प नियोजन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त म्हणून मदान यांनी सुमारे ५ वर्ष २ महिने काम पाहिले आहे. याकाळात मुंबईतील विविध विकास प्रकल्प, मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाला अंतिम रूप देण्याचे काम त्यांच्या कार्यकाळात झाले आहे.

नांदेडमधील देगलूर उपविभागात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून मदान यांची सर्वप्रथम नियुक्ती झाली. त्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी औरंगाबाद, अतिरीक्त जिल्हाधिकारी मुंबई झोपडपट्टी नियंत्रक, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त, नांदेडचे जिल्हाधिकारी, केंद्र शासनाच्या अणुऊर्जा विभागात उपसचिव, एमएमआरडीएमध्ये प्रकल्प संचालक (एमयुटीपी), म्हाडाचे उपाध्यक्ष, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आदी विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.

Intro:यु पी एस मदान राज्याचे मुख्यसचिव, आज कार्यभार स्वीकारणार

मुंबई 27

अर्थ विभागाचे प्रधान सचिव यु पी एस मदान हे राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहेत. मुख्यसचिव डी के जैन यांची केंद्रात लोकपाल च्या सदस्यपदी निवड करण्यात आल्याने मुख्यसचिव पद रिक्त झाले होते. मदान आज मुख्यसचिवपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

मदान यांनी विविध विभागात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. ते 1983 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी आतपर्यंत विविध विभागात काम केले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणूनही त्यांनी काही काळ जबाबदारी सांभाळली आहे. तसेच एमएमआरडीएचे कार्यकारी संचालक ही मदान कार्यरत होते. मदान यांना सहा महिने मुख्य सचिवपदाचा कार्यकाळ मिळणार असून सप्टेंबर महिन्यात ते निवृत्त होणार आहेत.

राज्याचे माजी मुख्य सचिव डी. के. जैन 31 जानेवारी रोजी निवृत्त होणार होते, मात्र त्यांना ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती .केंद्रात पिनाकी घोष यांची लोकपालपदी नियुक्ती झाल्यानंतर लोकपालचे सदस्य म्हणून डी. के. जैन यांची निवड झाली होती.दरम्यान सप्टेंबर महिन्यात मदान निवृत्त होणार आपले तरी पुढच्याच महिन्यात ऑक्टोबर मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका असल्याने त्यांना ही मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. Body:......Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.