मुंबई - मध्य रेल्वेने १२ विशेष गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. या गाड्या १ डिसेंबरपासून सुधारित वेळेत धावणार असून त्यांना काही थांबे देण्यात आले आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी हा महत्त्वाचा बदल आहे.
12 विशेष गाड्यांचे 1 डिसेंबरपासूनचे वेळापत्रक
- मुंबई-कोल्हापूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएएसएमटी) वरून दररोज सकाळी ८.४० वाजता सुटणार आहे. विशेष गाडी कोल्हापूरवरून दररोज सकाळी ८.१५ वाजता सुटेल.
- मुंबई-सोलापूर विशेष गाडी सीएएसएमटी येथून दररोज २२.४५ वाजता सुटणार आहे. विशेष गाडी सोलापूर येथून दररोज २२.४० वाजता सुटणार आहे.
- मुंबई-पुणे विशेष गाडी सीएएसएमटी येथून दररोज ०५.४० वाजता सुटणार आहे. विशेष गाडी पुणे येथून दररोज १८.३५ वाजता सुटणार आहे. मुंबई-पुणे विशेष गाडी सीएएसएमटी येथून दररोज १७.१० वाजता सुटणार आहे. विशेष गाडी पुण्याहून रोज ७.१५ वाजता सुटणार आहे.
- मुंबई-लातूर विशेष गाडी सीएएसएमटी येथून २१.०० वाजता सुटणार आहे. विशेष गाडी लातूर येथून २२.३० वाजता सुटणार आहे.
- पुणे-अजनी विशेष गाडी दर शनिवारी पुणे येथून २२.०० वाजता सुटणार आहे. विशेष गाडी दर रविवारी अजनीहून १९.५० वाजता सुटणार आहे.
- पुणे-अमरावती विशेष गाडी दर बुधवारी पुणे येथून १५.१५ वाजता सुटणार आहे. विशेष गाडी दर गुरुवारी अमरावतीहून १८.५० वाजता सुटणार आहे.
- पुणे-अजनी विशेष गाडी दर मंगळवारी पुणे येथून १५.१५ वाजता सुटणार आहे. विशेष गाडी दर शुक्रवारी अजनी येथून १९.५० वाजता सुटणार असून, पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता पोहोचेल.
- मुंबई-आदिलाबाद गाडी सीएएसएमटीहून दररोज १६.३५ वाजता सुटणार आहे.
गैरसोय टाळण्यासाठी वेळेत बदल
कोरोनामुळे काही गाड्यांच्या वेळात बदल झाल्याने अन्य गाड्यांचे पासिंग होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 12 विशेष प्रवासी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतारे यांनी दिली.
काळजी घेऊन प्रवास करण्याचे आवाहन
रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करताना प्रवाशांनी मास्क घालून खबरदारी घेत प्रवास करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे. तसेच रेल्वे स्थानकात कोविड चाचणी केंद्र देखील तयार करण्यात आले आहे. त्याठिकाणी काही लक्षणं असल्यास तपासणी करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. योग्य सोशल डिस्टन्सिंग तसेच सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.