मुंबई - बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगले आहे. अशातच बॉलिवूड मुंबईतच राहणार, आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्म सिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत म्हटले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशात गुंतवणूक व्हावी यासाठी व फिल्म इंडस्ट्री निर्माण व्हावी यासाठी सेलिब्रिटी व उद्योजक यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांनी आज भारतातील मोठे उद्योजक व सेलेब्रिटी यांच्याशी चर्चा केली. उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्म सिटी उभारण्याचे काम आम्ही करत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडामधील यमुना प्राधिकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी होईल, असे योगी यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले.
1 हजार हेकटरपॆक्षा अधिक जागेवर फिल्म सिटी उभारणार
आशियातील सर्वात मोठे विमानतळ असलेल्या जेवर विमानतळाजवळील १ हजार हेक्टरपेक्षा अधिक जागेवर ही फिल्म सिटी उभी करणार आहोत. या ठिकाणाहून उत्तर प्रदेशसह आणि देशातील इतर भागांशी जोडणारी दळणवळणांची सर्व साधने असतील. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही यासाठी रस दाखवल्याचे योगी म्हणालेत.
हेही वाचा - संजय राऊत यांच्यावर उद्या होणार 'अँजिओप्लास्टी'
ती काय पर्स आहे का? कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही -
ही काय पर्स आहे का? की ती कुणीही घेऊन निघून जाईल. ही खुली स्पर्धा आहे. सुरक्षा देण्याची, सामाजिक सुरक्षा देण्याची, कुणासोबत भेदभाव न करता चांगले वातावरण देण्याची गरज आहे. ती प्रत्येकाने दिली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. मुंबई फिल्म सिटी आपले काम करेल. यूपीतील नवी फिल्म सिटी त्यांचे काम करेल, असेही योगी यावेळी म्हणाले.
मोठ्या उद्योजकांना गुंतवणूकीचे आमंत्रण, उद्योजक सकारात्मक
आपल्या दुसऱ्या मुंबई दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांनी आज उद्योजक-बँकर्ससोबत चर्चा करून उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचं आवाहन केल्याचं म्हटलं. आज योगी आदित्यनाथ यांची टाटा सन्सचे एन. चंद्रशेखर, हिरानंदानी ग्रुपचे डॉ. निरंजन हिरानंदानी, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, सीमोन्सचे सीईओ सुप्रकाश चौधरी, एल अॅण्ड टीचे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यम, कॅपिटल सर्विसचे विकास जैन, केकेआरचे चेअरमन संजय नायर, सेंट्रम कॅपिटल लि.चे चेअरमन जसपाल बिंद्रा, टाटा अॅडव्हांस सिस्टिमचे सीईओ आणि एमडी सुकरण सिंग, टाटा डिफेन्स टेक्नॉलॉजीचे हर्षवर्धन, अदानी डिफेन्सचे आशिष राजवंश, अशोक लेलँडचे रजत गुप्ता, टेलिकॉम डिफेन्स सिस्टिमचे सीईओ टी.एस.दरबारी आदी उद्योजकांना भेटले व चर्चा केली. सोबतच मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा यांचीही योगी यांनी भेट घेतली. उद्योजकांनी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हेही वाचा - युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत; शेअर बाजारात केले लखनऊ बाँडचे अनावरण
भारताची इकॉनॉमी वाढावी हे लक्ष, कुणाची गुंतवणूक कुणी घेऊन जाणार नाही
बॉलिवूडमधील दिग्गजांचा अनुभव घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नवे मॉडल तयार करायचे आहे. वर्डक्लास फिल्म टी तयार करण्यासाठी फिल्मी दुनियेच्या लोकांशी चर्चा केली. आम्ही कुणाचे काही घेऊन जाणार नाही. आम्हाला नवीन निर्मिती करायची आहे. त्यासाठी आलो आहोत, असे सांगत योगींनी शिवसेनेला चिमटा काढला.
भारताची इकॉनॉमी वाढावी हे लक्ष आहे. कुणाची गुंतवणूक कुणी घेऊन जाणार नाही. कुणालाही बाधा आणायची नाही. भारताची इकनॉमी वाढवायची आहे. मला वाटते हेच सर्वांचंही लक्ष असेल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.
उत्तर प्रदेशातल्या लखनऊ बाँडचे अनावरण-
मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासून योगी आदित्यनाथ यांचा हा दुसरा मुंबई दौरा आहे. आज योगी आल्यानंतर एका छोटेखानी सोहळ्यात लखनऊ महापालिकेच्या(LMC) पहिल्यावहिल्या बाँडचं आज अनावरण बीएसई येथे केले. लखनऊ महापालिकेने शहराचं सौंदर्यीकरण, विकास आणि स्वच्छता इ. कामांना गती देण्यासाठी २०० कोटी रुपयांचा बाँड जारी केला आहे. या बाँडला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिल्याने हा बाँड ४.५ पट अधिक (४५० कोटी रुपये) सब्स्क्राईब झाला आहे. यामुळे आता उत्तर प्रदेश सरकार गाजिायाबाद, वाराणसी, आगरा आणि कानपूर इ. शहरांसाठी देखील बाँड लवकरच काढू, असे देखील योगी यांनी म्हटले.