ETV Bharat / city

DHFL Scam : अंडरवर्ल्डशी संबंध असलेला देशातील सर्वात मोठा DHFL बँक घोटाळा - रेबिका दीवान

देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठा DHFL बँक घोटाळा असलेल्या प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी साताऱ्यात छापेमारी केली त्यावेळी सीबीआयला या बँकिंग घोटाळ्यात अंडरवरची संबंध असल्याचे काही पुरावे सापडले आहे हे सर्व पुरावे अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim Evidence) सलग्न असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे डीएचएफएल बँक (DHFL Bank) घोटाळ्यातील अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आले आहे.

DHFL Bank
डीएचएफएल बँक
author img

By

Published : Jul 10, 2022, 4:38 PM IST

मुंबई: डीएचएफएल बँक (DHFL Bank) घोटाळ्याशी संबंधित सीबीआयने शुक्रवारी अजय नावंदरच्या घरी छापेमारी केल्यानंतर शनिवारी सीबीआयने आरोपी वाधवान बांधवांच्या सातारा जिल्ह्यातील महाबाळेश्वर येथील बंगल्यावर छापा टाकला. यावेळी सीबीआयला काही महागडे पेंटिग्ज मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी सीबीआयने केलेल्या तपासात या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाचे धागेदोरे थेट दाऊद इब्राहिमपर्यंत जात असल्याचा संशय वर्तवला जात आहे.

दुसरीकडे राज्यात सत्ता परिवर्तनानंतर वाधवान बंधू यांच्याविरोधातील कारवाईला वेग आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. सीबीआयनं 40 कोटी रुपयांची पेटिंग्स आणि मूर्ती जप्त केल्यात. या पेटिंग्स आणि मूर्ती बँकेच्या घोटाळ्याच्या पैशातून खरेदी केल्याचा आरोप आहे. अजय नावंदर हा दाऊदचा हस्तक छोटा शकीलचा जवळचा साथीदार आहेत. घोटाळ्यातील काही पैसा नावंदरच्या माध्यमातून फिरवण्यात आल्याचा संशय सीबीआयला असून त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी या छापेमारीबाबत(CBI raid) दिलेल्या माहितीनुसार, रेबिका दीवान आणि अजय रमेश नावंदर यांच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. बँक घोटाळ्याचे पैसे आरोपींनी इतर लोकांनाही दिल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासात या दोघांची नावं समोर आली आहेत.

रेबिका दीवान याप्रकरणातील मुख्य आरोपी कपिल वाधवान यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. सीबीआयनं महाबळेश्वर आणि मुंबईतील काही ठिकाणांवर छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान, अनेक महागडे पेटिंग्स आणि मूर्ती जप्त करण्यात आल्या. याव्यतिरिक्त संशयास्पद कागदपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणंही सीबीआयकडून जप्त करण्यात आली आहेत.

नेमकं प्रकरण काय?- देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय. सीबीआयकडून 34 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि महाबळेश्वरमध्ये छापे मारी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाचे धागेदोरे दाऊद टोळीपर्यंत पोहोचल्याचा संशय सीबीआयला आहे. कारण या छापेमारीत सीबीआयच्या हाती संशयास्पद कागदपत्रे लागली आहेत. त्यामुळे या बँक घोटाळ्यात अंडरवर्ल्डची एन्ट्री झाल्याचं मानलं जात आहे. देशातला आतापर्यंत सर्वात मोठा बँक घोटाळा उघड झालाय. सीबीआयनं 17 बँकांच्या समूहाला 34 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपांतर्गत 22 जून 2022 रोजी एफआयआर दाखल केला होता. आणि या प्रकरणी त्याच दिवशी तब्बल 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. याप्रकरणी आरोप आहे की सर्व नियम धाब्यावर बसवून आरोपींनी बँकेतून घेतलेली रक्कम त्यांच्या वैयक्तिक कामासाठी वापरली. त्यामुळे बँकांचं मोठं नुकसान झालं. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे.

हेही वाचा : Mulund Crime : सुन्न करणारी घटना! आईची हत्या करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.