मुंबई- एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे ( NCB Zonal Director Sameer Wankhede ) यांच्या कुटुंबीयांबाबत यापुढे कोणतेही विधान करणार नाही, अशी हमी आज (दि.10) शुक्रवार अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफी ( Unconditional apology of Nawab Malik ) मागितली आहे.
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कुटुंबाविरुद्ध कोणतेही वक्तव्य न करण्याचे आश्वासन देऊनही अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वक्तव्य केले. त्यामुळे मंत्री मलिक यांना न्यायालयात माफी मागावी लागली. उच्च न्यायालयाने मलिक यांना नोटीस बजावून न्यायालयाच्या आधीच्या आदेशाचे जाणूनबुजून उल्लंघन ( willful breach of NCP leader Nawab Malik ) केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई का करू नये, याचे स्पष्टीकरण देणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले.
हेही वाचा-Contempt Petition On Nawab Malik : नवाब मलिकांविरोधात ज्ञानदेव वानखडे यांची अवमान याचिका
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या मानहानीच्या खटल्यात ( Dnyandev Wankhede defamation case against Nawab Malik ) राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीरच्या कुटुंबाविरुद्ध वक्तव्ये करू नयेत, असे त्यांनी न्यायालयाला पटवून दिले होते. यानंतरही त्यांनी टिप्पणी केली. यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात माफी मागितली आहे.
नवाब मलिक म्हणाले की, स्वत:च्या विधानाच्या विरोधात जाऊन उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागतो. न्यायालयाच्या आदेशाचा अनादर करण्याचा किंवा त्याचे उल्लंघन करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले. नवाब मलिक म्हणाले की, माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देत असल्याने त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले. वानखेडे यांच्या वकिलांनी सांगितले की, नवाब मलिक यांच्या इतर कोणत्याही मुद्द्यावर आक्षेप नाही. मात्र, त्यांनी समीर वानखेडे यांच्याबाबत भाष्य करू नये.
काय आहे प्रकरण?
नवाब मलिक यांच्याविरोधामध्ये समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. यामध्ये निर्णय दिला जाईपर्यंत वानखेडे कुटुंबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी लेखी हमी मलिक यांनी दिली होती. मात्र त्यानंतरही आपल्या कुटुंबीयांवरील आरोपांच्या फैऱ्या सुरूच असल्याची बाब ज्ञानदेव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना खडसावले.
हेही वाचा-State Govt. Affidavit In SC : ओबीसीला आरक्षणाशिवाय निवडणूक नको, राज्य सरकार देणार सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
न्यायालयाच्या आदेशानंतरही चैत्यभूमीवर केले होते वक्तव्य-
समीर वानखेडे हे चैत्यभूमीवर आल्यानंतर नवाब मलिक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना वानखेडे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते, की समीर वानखेडे हे कधी चैत्यभूमीवर अभिवादनाकरता आले का नाही हे मला माहित नाही. पण, ते माझ्यासोबत नमाज पढायला नियमितपणे यायचे हे माहिती आहे.