मुंबई- संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर भारतात आले आहेत. या वर्षी जानेवारीत त्यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात केली. ते आयआयटी मुंबई येथे देखील संबोधित करतील.
संयुक्त राष्ट्र महासचिव अँटनीयो गुटेरेस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26/11 तील शहिदांच्या स्मारकाला पुष्प चक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मुंबईच्या ताज पेलेस येथे श्रद्धांजली वाहिण्यात आली.
दहशतवाद संपवायचा आहे- युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस, अँटोनियो गुटेरेस यांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील वाचलेल्या देविका यांची भेट घेतली. तिला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गोळी लागून दुखापत झाली होती. तिच्या साक्षीमुळे दहशतवादी अजमल कसाबवर खटला चालविण्यात आला होता. देविका रोटवान म्हणाली, की मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जखमी झाले होते. कोर्टात अजमल कसाबची ओळख पटवली. मी त्यांना असेही सांगितले की मला शिकायचे आहे आणि अधिकारी बनायचे आहे, दहशतवाद संपवायचा आहे.
गुटेरेस हे 18-20 ऑक्टोबर 2022 या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असणार आहेत. जानेवारी 2022 मध्ये त्यांनी आपला दुसरा कार्यकाळ सुरू केल्यानंतर त्यांची ही पहिलीच भारत भेट असेल. त्यांनी यापूर्वी 2018 मध्ये भारताला भेट दिली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट केले की, 18-20 ऑक्टोबर 2022 या कालावधीत भारताच्या अधिकृत भेटीसाठी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस यांचे मुंबईत आगमन होत असताना त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
भारत भेटीची सुरुवात- मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली अर्पण करून गुटेरेस आपल्या भारत भेटीची सुरुवात केली. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस हे आयआयटी मुंबई येथे इंडिया @75: यूएन-इंडिया पार्टनरशिप: स्ट्रेंथनिंग साऊथ-साउथ कोऑपरेशन” या विषयावर भाषण करणार आहेत. 20 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमध्ये (एकता नगर, केवडिया), ते मिशन LiFE (पर्यावरणासाठी जीवनशैली) पुस्तिका, लोगो आणि टॅगलाइन लॉन्च करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत.